'पर हक मांगने लगे तो खफा हो गए जनाब' ; सोलापुरात - उर्दू द्वैभाषिक मुशायरा रंगला 

प्रकाश सनपूरकर
Saturday, 16 January 2021

भारतीय उर्दू विकास फौडेशनच्या वतीने शमा उर्दू शाळेत ज्येष्ठ कवी नूर सगरी यांच्या अध्यक्षतेखाली व बीडचे कवी गुलाम साकीब यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्दू-मराठी कवी संमेलन संपन्न झाले. 

सोलापूर ; गैरों को वार करने की हाजत नही रही, पर हक मांगने लगे तो खफा हो गए जनाब, या शब्दात कवी आरजू राजस्थानी यांनी सादर केलेल्या कवितांना प्रतिसाद मिळाला. 

भारतीय उर्दू विकास फौडेशनच्या वतीने शमा उर्दू शाळेत ज्येष्ठ कवी नूर सगरी यांच्या अध्यक्षतेखाली व बीडचे कवी गुलाम साकीब यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्दू-मराठी कवी संमेलन संपन्न झाले. 

कवी अय्यूब अहमद यांनी, 
ती दिसली गालात हसली 
मी दचकलो, त्यांनी कां हसली ? 
ती उत्तरली, 
चांगला वाटत होता 
कोरोना काळात 
पोलिसांचा प्रसाद घेताना ! 
या शब्दात कोरोना काळातील व्यंग मांडले. 

शांदा पिता पूरी यांनी, 
नसीब अपना बनाना चाहता हूं 
पकड कर गुंबंद खिजरा की जाली 
रूदाद सुनाना चाहता हूं, या ओळीत उर्दू काव्य सादर केले. 

गुलाम साकीब बीड यांनी बदलत्या स्थितीवर, 
हालात के साथ बदल गए सारे कंकर, 
अब अपने नही रहे जो कभी थे अपने कंकर, असे काव्य मांडले. × 

ज्येष्ठ कवी आरजू राजस्थानी, नुर सगरी, शादां पित्तापूरी, अन्वर अहमद अन्वर, अय्यूब अहमद अय्यूब यांनी रचना सादर केल्या. या वेळी उर्दू विकास फौंडेशनचे अध्यक्ष सुलतान अख्तर यांनी प्रास्ताविक केले. प्रा डॉ. तांबोळी यांनी सांगितले की, द्वैभाषिक मुशायराचे आयोजन ही काळाची गरज आहे. कवींच्या वाणीने दोन माणसांचे व दोन भाषिकांचे मने जोडली जातात. मराठी भाषेची कवीता व उर्दू भाषेची शायरी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे असे सांगितले. 
बीड चे तरुण कवी गुलाम साकिब यांनी सांगितले की, प्रत्येक भाषा व त्यातील साहित्य हे समाजोपयोगी असते. आजकालच्या स्थितीवर वृतपत्रामध्ये विशेष पुरवण्यांमधी सद्यस्थितीवर येणारे लेखन हीच वाचनाची प्रेरणा आहे. कवितेत "प्यार- मुहब्बत' च्या पलिकडंचे विषय यायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. विविध विषयांवरील कवीता सादरीकरणांला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. सुत्रसंचालन अन्वर कमिश्नर यांनी केले. आभार प्रा. डॉ. रशीद शेख यांनी मानले. कार्यक्रमास शमा शिक्षणचे अबुबकर नल्लामंदू, जनसेवा शिक्षक संघाचे महिबूब तांबोळी, इंडियन युथचे मजहर अल्लोळी, प्रा. रशीद, मोईन शेख व नवीद शेख उपस्थित होते  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'But when you started asking for rights, you got angry, sir'; In Solapur - Urdu bilingual Mushaira Rangala