
सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज सकाळी 11 वाजता होणारी बैठक रद्द झाली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून आता ही बैठक आज दुपारी दोन वाजता होणार आहे.
सोलापूर : सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज सकाळी 11 वाजता होणारी बैठक रद्द झाली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून आता ही बैठक आज दुपारी दोन वाजता होणार आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे महेश कोठे व सोलापूर शहर राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
या बैठकीत राष्ट्रवादीच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचेही मत विचारात घेऊन प्रवेशाची वेळ निश्चित केली जाणार आहे. प्रवेश करण्यासाठी महेश कोठे हे त्यांच्या जास्तीत जास्त समर्थकांना घेऊन मुंबईला रवाना होणार होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जास्त समर्थकांना आणू नका, तुम्मी वैयक्तिक व मोजक्याच समर्थकांसोबत मुंबईला या अशा सूचना प्रदेश राष्ट्रवादीकडून महेश कोठे यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे महेश कोठे व काही मोजके समर्थक काल रात्री मुंबईत दाखल झाले आहेत. सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, महिला अध्यक्ष सुनील रोटे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्यासह सोलापूर शहर राष्ट्रवादीतील प्रमुख पदाधिकारी येथील आज मुंबईत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीतील जुन्या कार्यकर्त्यांसोबत शरद पवार हे महेश कोठे यांच्या उपस्थितीत प्रवेशाबाबत बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर महेश कोठेयांचा प्रवेश कधी व किती वाजता होणार हे ठरले जाणार आहे.
शिवसेनेतून कायमची हकालपट्टी
सोलापूरचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी आज सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमस्वरूपी हकालपट्टी केल्याची घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही हकालपट्टी केल्याचे त्यांनी सांगितले. महेश कोठे यांनी यापूर्वी जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत असताना भाजपमध्ये जाण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते भाजपच्या संपर्कात असल्याने 2019 मध्ये शहर मध्यमधील शिवसेनेची त्यांची उमेदवारी कापली असल्याचा खुलासाही जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल