
सोलापूर : जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या चार आरोपींना अटक करून पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 281 ग्रॅम चांदीचे दागिने व इतर असा एकूण सहा लाख 21 हजार 180 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना जुना कारंबा नाका येथे रस्त्याच्या कडेला कार (क्र. यू. पी. 13 / ए. एन. 5438) उभी असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामध्ये चार संशयित व्यक्ती चर्चा करीत बसल्याचे दिसून आले. सदरची गाडी ही परराज्यातील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. संशयित व्यक्तींना त्यांची नावे व पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे सैफअली मोहम्मद अली सय्यद (वय 26, रा. मोहल्ला परिखॉं, कसबा गुलावटी, जि. बुलंदशहर, उत्तर प्रदेश), मोहम्मद मुबशीर अब्दुल अजीज शेखसिद्दीकी (वय 43, रा. हाजी यांच्या घरात, गल्ली नंबर 4, मुस्तफाबाद, दिल्ली), मोहंमद शकील नूरमहंमद तेली (वय 44, रा. मोहल्ला कहिलीयान, फरीदनगर, जि. गाझिायाबाद, उत्तर प्रदेश) व तन्वीरअहमद जहीरअहमद अन्सारी (वय 32, रा. कोठीयात, सिव्हिल लाइन, कोतवाली नगर, उत्तर प्रदेश) असे सांगितले.
सोलापूर शहरातील सोसायटींमध्ये वॉचमन ठेवले जात नाहीत. त्यामुळे या चोरांनी मिळून हायवे लगत असलेल्या द्वारका विहार, मडकी वस्ती, अवंती नगर, जुना पूना नाका, माकणे अपार्टमेंट, शेळगी तसेच डी - मार्ट जवळील कमलश्री अपार्टमेंट येथील बंद असलेल्या घरांची पाहणी करून चोरी करत असल्याची कबुली दिली. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सीसीटीव्हीत कैद
घरफोडी ठिकाणची क्षणचित्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचेही समोर आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना 18 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.