कष्टाने परिस्थिती बदलत असताना कोरोना आघाताने 'त्याचे' खंडित झालेले शिक्षण अखेर सावरले! वाचा सविस्तर 

शाम जोशी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

सोलापूरहून पुण्यात गेलेल्या सुरजने एका हॉटेलात काम करून शिक्षण सुरू केले. परंतू कोरोना संकटामुळे हॉटेल बंद झाले अन्‌ सुरजच्या शिक्षणाची कोंडी झाली. शिक्षणासाठी पैसा नसल्याने सोलापूरात तो निराश मनाने घरी परतला. अडकलेले शिक्षण आणि थांबलेले काम यामधून त्याला मार्ग कसा काढावा हा पेच त्याच्या समोर होता. 

दक्षिण सोलापूर(सोलापूर): सोलापूर शहरातील प्रतिकुल स्थितीत सुरज उमरदंड पूणे शहरात एकीकडे हॉटेलमध्ये काम करून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. पण कोरोना संकटात त्याची कमवा व शिका उपक्रमात देखील अडथळा आला. शिक्षण सोडून निराश मनाने सोलापूर मध्ये परतल्यानंतर अचानक मिळालेल्या मदतीने सुरज आता पुन्हा एकदा शिक्षणाच्या वाटेवर लागला आहे. 

हेही वाचाः महापालिका हद्दीत आज नवे 106 कोरोना बाधित 

सोलापूरहून पुण्यात गेलेल्या सुरजने एका हॉटेलात काम करून शिक्षण सुरू केले. परंतू कोरोना संकटामुळे हॉटेल बंद झाले अन्‌ सुरजच्या शिक्षणाची कोंडी झाली. शिक्षणासाठी पैसा नसल्याने सोलापूरात तो निराश मनाने घरी परतला. अडकलेले शिक्षण आणि थांबलेले काम यामधून त्याला मार्ग कसा काढावा हा पेच त्याच्या समोर होता. 
सुरज उमरदंड एका सामान्य कुटूंबातील तरूण. कामासाठी त्याने पुणे गाठले. मात्र व्यावसायिक शिक्षण नसल्याने मनाजोगे काम मिळेना. म्हणून व्यावसायिक शिक्षण घेण्याचे त्याने ठरवले. परंतू पैशाची अडचण येऊ लागली. सात वर्षापूर्वी वडीलांचे छत्र हरवल्याने करात कमावतं कुणीच नाही. त्याची आई छोटी मोठी कामे करून कसाबसा संसाराचा गाडा ओढत होती. त्यामुळे तिच्याकडून पैसे मिळणे शक्‍यच नव्हते. 

हेही वाचाः बार्शीत सुधारित चौदा दिवसाचा प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश तत्काळ रद्द करा! कोणी केली मागणी? ते वाचा 

अशा स्थितीत त्याने "कमवा व शिका'चा मार्ग स्विकारला. एका हॉटेलात काम करून हॉटेल मॅनेजमेंटचे व्यावसायिक शिक्षण सुरू केले. दोन वर्षाचे शिक्षण यानुसार झाले. मात्र तृतीय वर्षात असताना मार्चमधे कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल व्यवसाय बंद झाले. त्यामुळे सूरजचे काम गेले अन्‌ पैसे नसल्याने शिक्षण थांबवावे लागले. शिक्षण थांबवून सोलापूरात आल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याचा कोरडा सल्ला देणारे अनेक भेटले. त्याच्या अडचणीची माहिती विरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांना समजली. तेव्हा त्यांनी सुरजला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत करण्याचे ठरवले. त्याला तातडीने लागणारी आर्थिक मदत देऊ केली. बुरकुले यांच्यामार्फत समाजसेवक जयनारायण भुतडा यांनी सुरजला पाच हजार रूपयांचा धनादेश दिल्याने त्याचा शिक्षण सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  पुढील काळातही सुरजला पाठबळ देण्याचा  निर्धार या दात्यांनी केला आहे. 

 
संपादन ः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While the situation was changing with difficulty, Corona's shock finally recovered 'his' broken education! Read detailed