कोण म्हणतेय डॉ. आव्हाडांनी राजीनामा द्यावा 

संतोष सिरसट 
बुधवार, 8 एप्रिल 2020

सोलापूर ः जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या देखत एखाद्या सामान्य माणसाला बेदरकार मारले जाते. हे दृष्य ते पाहतात. पण, त्यावेळी त्यांनी काहीही केले नाही. आव्हाडांनी केलेल्या त्या कृत्याचा मी निषेध करतो. मानवतेला न शोभणारे बेजबाबदार कृत्य केल्याबद्दल आव्हाडांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी आज केली आहे. 

आव्हाड यांनी त्यांच्यावर सोशल मिडियातून टीका केल्याबद्दल एका व्यक्तिला त्यांच्या बंगल्यावर आणून बेदम चोप दिला आहे. त्याठिकाणी पोलिस असूनही त्यांनी काहीच केले नाही. देशात लोकशाही असतानाही अशाप्रकारचे कृत्य केलेच कसे जाते? असा सवालही आमदार देशमुख यांनी उपस्थित केला आहे. आव्हाडांना नेहमी चर्चेत राहावे असे वाटत असेल तर वाईट गोष्टी करुन चर्चेत राहण्यापेक्षा चांगल्या गोष्टी करुन चर्चेत राहावे असा टोलाही आमदार देशमुख यांनी लगावला आहे. त्यांच्यावर जण कोणी टीका केली असेल तर देशात असलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून संबंधितांवर योग्य ती कारवाई करता आली असती. मात्र, त्यांनी थेट त्या व्यक्तिला मारहाण करुन हुकुमशाहीचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे आव्हाड यांनी त्याची जबाबदारी स्विकारत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who says Dr. The Avhad should resign