बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर प्रशासन का कारवाई करत नाही : सभापती ननवरे

Why the administration does not take action against those who extract sand
Why the administration does not take action against those who extract sand

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर व सिना नदी भागातुन बेकायदा वाळू उपसा सुरु आहे. याला प्रशासन पाठीशी घालत असून तालुक्यातील वाळू उपसा तात्काळ बंद करावा व या वाळु उपसा करणाऱ्ंयावर प्रशासन कारवाई का करत नाही, यांची चौकशी करावी, अशी मागणी करमाळा पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला आहे.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, करमाळा तालुक्यातील कंदर, बिटरगाव (वां), वांगी नं. 3, चिखलठाण, कोंढारचिंचोली, रामवाडी, कात्रज, जिंती या भागात उजनी जलाशयतुन अवैधरित्या राञदिवस वाळू उपसा सुरू आहे. सीना नदीतूनही रात्री वाळू उपसा चालत आहे. या अवैधरीत्या वाळू उपसा सुरू करणाऱ्या वाळू माफियांना महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन पाठीशी घालत आहे. करमाळा तालुक्यात अवैद्यरित्या वाळु उपसा करणाऱ्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. वाळु उपसा करण्यावरून वांगी येथे दोन दिवसापुर्वी दोन गटात हाणामारी झाली आहे. त्यामुळे या भागातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. याशिवाय उजनी बॅकवॉटर भागात उपास केलेली वाळु वहातुक करताना वाळु माफिया परिसरातील शेतकऱ्यांना धमकावित आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत. याशिवाय वाळु उपास करणाऱ्या वहानामुळे या भागातील रस्त्याची दुरावस्था होत आहे. याशिवाय तालुक्याच्या पुर्व भागात सीना नदीतून आळजापुर, बिटरगांव (श्री), निलज, संगोबा, तरटगांव, पोटेगाव येथे वाळु उपसा होत आहे.

कारवाई का नाही
मागील आठवड्यात करमाळ्याच्या पश्चिम भागातील वाळु उपसा करणाऱ्या बोटी इंदापुराच्या तहसीलदार व पोलिसांनी फोडल्या माञ करमाळ्याचे तहसीलदार व पोलिस का कारवाई करत नाहीत?  कारवाई केलीच तर वाळु उपसा करणाऱ्या बोटी व वहान मालक सोडुन एखाद्या परप्रांतीयावर किरकोळ कारवाई केली जाते. यामुळे तालुक्यातील अवैद्यरित्या वाळु उपसा करण्यास कोण पाठिंबा घालत आहे यांची चौकशी झाली पाहीजे. 
- गहिनीनाथ ननवरे, सभापती पंचायत समिती, करमाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com