वडिलांनी केले मदतीचे आवाहन
पेपर विक्री करणाऱ्या कुटुंबातील अभिषेकला रक्ताचा कर्करोग झाल्याने तो आता सोलापुरातील सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून त्यांना अवघे 45 हजार रुपये मिळाले आहेत. मात्र, अभिषेकवरील उपचारासाठी साडेचार लाखांचा खर्च होणार आहे. त्यामुळे अभिषेकचे वडील गौरीशंकर धमामे (मोबाइल क्र. 9673266130) यांनी बॅंक ऑफ इंडियामधील 070810110007533 (आयएफसीएस कोड- बीकेआयडी 0000708) या बॅंक खात्यात शक्य तेवढी मदत जमा करावी, असे आवाहन केले आहे.
सोलापूर : वडिलांचा पेपर विक्रीचा व्यवसाय... घरात विवाहाला आलेली बहिण आणि गृहिणी म्हणून काम करणारी आई... कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी म्हणून मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभिषेकचे शिक्षण सुरु आहे. मात्र, डॉक्टरांनी आजारी अभिषेकची चाचणी केली आणि आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करुन कुटुंबाला हातभार लावणाऱ्या अभिषेकला "ब्लड कॅन्सर' असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. मात्र, कुटुंबाची परिस्थिती नसल्याने त्याचा दवाखान्याचा खर्च आई-वडिलांना न सोसणारा आहे. परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या स्वावलंबनातून शिक्षण घेणाऱ्या अभिषेकला आता कर्करोगावर मात करण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे.
वडिलांनी केले मदतीचे आवाहन
पेपर विक्री करणाऱ्या कुटुंबातील अभिषेकला रक्ताचा कर्करोग झाल्याने तो आता सोलापुरातील सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून त्यांना अवघे 45 हजार रुपये मिळाले आहेत. मात्र, अभिषेकवरील उपचारासाठी साडेचार लाखांचा खर्च होणार आहे. त्यामुळे अभिषेकचे वडील गौरीशंकर धमामे (मोबाइल क्र. 9673266130) यांनी बॅंक ऑफ इंडियामधील 070810110007533 (आयएफसीएस कोड- बीकेआयडी 0000708) या बॅंक खात्यात शक्य तेवढी मदत जमा करावी, असे आवाहन केले आहे.
सोलापुरातील सैफूल परिसरातील निवारा नगरात वास्तव्यास असलेले वृत्तपत्र विक्रेते गौरीशंकर धमामे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी अश्विनी पदवीचे शिक्षण घेत असून, ती द्वितीय वर्षात शिकत आहे. तर अभिषेक हा आता अकरावीचे शिक्षण घेत आहे. पत्नी गृहिणी असून मुलांच्या शिक्षणासाठी गौरीशंकर यांची धडपड आहे. वडिलांची धडपड पाहून अभिषेकही त्यांना लहानपणापासून मदत करु लागला. सकाळी उठल्यानंतर वाचकांच्या हातात पेपर पडावा, पहाटे उठून कधी सायकलवर तर कधी पायपीट करीत पेपर वाटायचा. सर्वकाही सुरळीत होते, मुलगा मदत करत असल्याने गौरीशंकरही आनंदात होते. मात्र, गौरीशंकर यांच्या सोन्याच्या संसाराला नजर लागली आणि अभिषेक आजारी पडला. त्यानंतर त्यांनी अभिषेकला दवाखान्यात तपासणीसाठी नेले. त्यावेळी अभिषेकला "ब्लड कॅन्सर' असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि गौरीशंकर यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कष्ट करणाऱ्या अभिषेकच्या उपचारासाठी आता गौरीशंकर यांना आर्थिक पाठबळ हवे आहे.