पतीच्या निधनाच्या धक्‍क्‍याने चोवीस तासातच पत्नीने सोडले प्राण 

अश्‍पाक बागवान 
Tuesday, 27 October 2020

पतीच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचा पत्नी पद्मा यांना मानसिक धक्का बसला. दिवसभरात त्यांना ही अस्वस्थ वाटू लागले होते. दरम्यान, आज मंगळवारी (ता. 28) पहाटे पाच वाजण्याचे सुमारास त्यांचेही निधन झाले. केवळ चोवीस तासातच पती-पत्नीचे निधन झाल्याच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

बेगमपूर (सोलापूर) : पती निधनाच्या धक्‍क्‍याने अवघ्या चोवीस तासातच पत्नीनेही प्राण सोडल्याची दुख: घटना बेगमपूर (ता. मोहोळ) येथे आज मंगळवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल शंकर कपडेकर (वय 55) व पद्मा अनिल कपडेकर (वय 50) असे या पती-पत्नीचे नाव आहे. त्यांच्या पश्‍चात विवाहित एक मुलगी, एक भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

कपडेकर हे बाल वयापासूनच वडिलोपार्जित सायकल भाडे व दुरुस्तीचा व्यवसाय संभाळीत होते. त्यामुळे गावातील सर्वात जुने सायकल दुकानदार म्हणून ते ओळखले जात. आर्थिक परिस्थिती अभावी त्यांच्या पत्नीही वाघोली येथील सुत मिलवर रोजनदारीवर काम करीत होत्या. लॉकडाउन काळात मिलवरचे काम बंद झाल्याने त्या मंगळवेढा येथे एका खासगी शाळेत मदतनीस म्हणून काम पहात होत्या. कपडेकर यांना दोन दिवसांपूर्वी पोटदुखी व उलटीचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागले होते. उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान सोमवारी (ता.26) पहाटे पाच वाजण्याचे सुमारास त्यांचे निधन झाले. गावीच दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान पतीच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचा पत्नी पद्मा यांना मानसिक धक्का बसला. दिवसभरात त्यांना ही अस्वस्थ वाटू लागले होते. दरम्यान, आज मंगळवारी (ता. 28) पहाटे पाच वाजण्याचे सुमारास त्यांचेही निधन झाले. केवळ चोवीस तासातच पती-पत्नीचे निधन झाल्याच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within twenty four hours of her husbands death she died