डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत सर्दी ताप खोकल्याच्या गोळ्या

 Without a doctor's prescription Do not get cold fever cough pills
Without a doctor's prescription Do not get cold fever cough pills
Updated on

सोलापूर : शहर जिल्ह्यामध्ये सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे रुग्ण औषध दुकानांमध्ये जाऊन त्यावरच्या गोळ्या घेत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे यापुढे शहर जिल्ह्यातील कोणत्याही औषध दुकानामधून नोंदणीकृत डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारख्या गोळ्या रुग्णांना न देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज काढले आहेत. 

याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, औषध दुकानदारांनी नोंदणीकृत डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन दाखवल्याशिवाय गोळ्यांची विक्री करू नये. जे रुग्ण गोळ्या घेण्यासाठी औषध दुकानांमध्ये येतील त्या रुग्णांचा पूर्ण पत्ता जतन करून ठेवायचा आहे. याशिवाय सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आपल्या शेजारच्या दवाखान्यांमध्ये दाखवायचे आहे. सोलापूर शहरांमध्ये फीवर क्‍लीनिक उघडलेले आहेत. त्या ठिकाणी अशा रुग्णांनी जाऊन डॉक्‍टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात 69 निवारा केंद्र 
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जे स्थलांतरित मजूर आहेत, त्यांच्यासाठी जिल्ह्यात 69 निवारा केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. त्या निवारा केंद्रांमध्ये 5622 जण आश्रित आहेत. त्यांना शासनाच्या वतीने जेवण व वैद्यकीय सुविधा पुरविली जात आहे. 

9021 वाहने जप्त 
आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शहर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2856 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 272 जणांना अटक करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत शहर जिल्ह्यात 9021 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com