महिला अडकल्याचे लोकांनी सांगितल्यावर कळाले पण तेव्हा... 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

गेली चार वर्षे येथील हिरा ढाब्यावर त्या कामास होत्या. सकाळी साडेनऊच्या दरम्यान कामावर जात असताना मार्केट यार्डसमोर रुग्णवाहिका (एमएच 14 सीएल 0698) चालक गणेश गोविंद कोळेकर (रा. माळशिरस) हा वाहन मागे घेत असताना राजश्री राठोड या गंभीर जखमी झाल्या.

नातेपुते (सोलापूर) : मार्केट यार्डसमोर रुग्णवाहिका चालकाच्या बेपर्वाईमुळे राजश्री नारायण राठोड (वय 35) या कामगार महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की मृत राजश्री राठोड या कर्नाटकमधील शिरड (ता. इंडी) येथील मूळ रहिवासी आहेत.

त्या आई-वडील, भावासह नातेपुते येथे रोजगारासाठी आल्या आहेत. गेली चार वर्षे येथील हिरा ढाब्यावर त्या कामास होत्या. सकाळी साडेनऊच्या दरम्यान कामावर जात असताना मार्केट यार्डसमोर रुग्णवाहिका (एमएच 14 सीएल 0698) चालक गणेश गोविंद कोळेकर (रा. माळशिरस) हा वाहन मागे घेत असताना राजश्री राठोड या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. राठोड यांना उजवी मांडी, छाती, पोटात गंभीर मार लागला होता. उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. 
वाहनचालक कोळेकर हा अत्यंत बेपर्वाईने वाहन चालवीत होता. त्याला त्याच्या वाहनाखाली आलेली व्यक्तीही समजली नाही. आजूबाजूच्या लोकांनी ओरडून सांगितले, तुझ्या वाहनाखाली लेडीज अडकली आहे. तेव्हा त्याने पाहिले. लोकांनी वाहन बाजूला करून महिलेला बाहेर काढले. आयडीबीआय बॅंकेसमोर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली. मयत राठोड यांचे भाऊ नागराज कोणशिरसगी यांनी नातेपुते पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. तपास पोलिस तळेकर करीत आहेत. कामगार महिलेच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman killed in ambulance accident