बाजार मोडूनही महिलांची पत कायम ः बचतगटांची कोरोना वर्षात कर्ज परतफेड 98 टक्के

bachatgat new.jpg
bachatgat new.jpg

सोलापूर ः गंभीर कोरोना संकटातही जिल्ह्यातील महिला बचतगटांनी बॅंकाच्या कर्जाची परतफेड चक्क 99 टक्के केली आहे. अर्थकारण कोसळत असताना त्यांची कर्जफेडीची कामगिरी बॅंकिंग क्षेत्रासाठी आगळी वेगळी ठरली.

जिल्ह्यातील बचत गटांच्या उलाढालीसाठी बॅंकांनी नव्या आर्थिक वर्षात तब्बल शंभर कोटी रुपयांची विक्रमी रकमेची कर्जे नव्याने वितरित केली आहेत. 
संपलेले आर्थिक वर्ष खरेतर बॅंकासाठी अत्यंत अडचणीचे होते. कर्ज वसुली वेळेवर होण्याच्या अडचणी भरपूर होत्या. व्यवसाय व उद्योग लॉकडाउनमध्ये अडचणीत आल्याने कर्ज परतफेडीचा प्रश्‍न महत्त्वाचा ठरला होता. मात्र या संकटात महिला बचत गटांनी चिकाटी सोडली नाही. जमेल त्या पध्दतीने मार्ग काढत त्यांनी त्यांच्या बॅंक कर्जाची परतफेड चालूच ठेवली. प्रत्यक्षात या स्थितीत केलेली कर्जफेड ही बॅंकांसाठी अनपेक्षित होती. कर्ज परतफेडीचे प्रमाण जवळपास 99 टक्‍क्‍यावर पोहोचले. त्यांच्या या कामाची दखल घेत बॅंकांनी तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद देत या महिन्यात सुरु झालेल्या आर्थिक वर्षासाठी तब्बल शंभर कोटींपेक्षा अधिक रकमाची कर्जे वितरित केली आहेत. कोरोना, संप, व्यवसायवाढीच्या अडचणी यातून मार्ग काढत ही कामगिरी राज्यात अग्रमानांकित ठरली आहे. 

ठळक बाबी 
- कोरोना संकटात कर्ज परतफेडीचा दर 98 टक्‍क्‍याच्या वर 
- या आर्थिक वर्षात 101 कोटी रुपयांचे कर्ज वाटप 
- माळशिरस तालुक्‍यात सर्वाधिक 20 कोटी रुपयांचे कर्ज वाटप 
- बचत गटाच्या रुक्‍मिणीज ब्रॅंडला मोठा प्रतिसाद 
- जिल्ह्याबाहेर उत्पादने पाठवण्याच्या अडचणीवर मात 
- उत्पादनांमध्ये परिस्थितीनुसार बदल 

उत्कृष्ट कामगिरी 
कोरोना, कर्मचाऱ्यांचा संप व नंतर राहिलेल्या अल्पकालावधीत जिल्हा परिषद, उमेद व बॅंकांच्या टीम वर्कने शंभर कोटी रुपये कर्ज वाटपाचा आकडा गाठलाच. राज्यात ही कामगिरी निश्‍चित चांगली असणार आहे. 
- प्रशांत नाशिककर, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर 

चांगली कामगिरीचा प्रयत्न  
जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी, प्रकल्प संचालक अर्जुन गुंडे यांच्यासह सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बॅंकांच्या सहकार्याने ही कामगिरी करणे शक्‍य झाले. 
- मीनाक्षी मडवली, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद सोलापूर  


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com