पन्नास वर्षांपासून रखडलेल्या बांगर ओढा पुलाचे काम अखेर सुरू ! नऊ गावे जोडली जाणार 

Bangar Odha
Bangar Odha
Updated on

पोथरे (सोलापूर) : पन्नास वर्षांपासून रखडलेल्या लिंबेवाडी येथील बांगर ओढ्यावरील पुलाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या पुलामुळे आता करमाळा तालुक्‍यातील पाच व नगर जिल्ह्यातील चार गावांमध्ये दळणवळण सुरू होऊन ही गावे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. 

या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलासाठी जिल्हा परिषद शेष फंड व उर्वरित रक्कम संतोष वारे स्वतः खर्च करून पूल पूर्णत्वास नेणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुलाचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून सुटल्याने येथील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

लिंबेवाडी (ता. करमाळा) येथील बांगर ओढ्यातून वणवेवस्ती, साबळेवस्ती, लोखंडेवस्ती, पवारवस्ती, लोणी, खातगाव, पुनवर, राखवाडी, वाघमारेवस्ती या गावांतील नागरिकांच्या दळणवळणासाठी हा महत्त्वाचा पूल आहे. परंतु, या ओढ्यावर जलस्वराज्य योजनेतून खोलीकरण झाल्याने व पावसाळ्यात हा ओढा पाण्याने वाहत असल्याने या नऊ गावांचा संपर्क सहा महिने बंद पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन व येथील ग्रामस्थांच्या मागणीवरून संतोष वारे यांनी जिल्हा परिषद सदस्या राणी वारे यांच्या सेस फंडातून 50 हजार तर सिमेंट नळ्या उर्वरित इतर खर्च संतोष वारे यांनी स्वखर्चाने करण्याची जबाबदारी घेतली आहे. हा पूल झाल्यावर येथील नागरिकांच्या येण्या-जाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

या वेळी संतोष वारे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार तळागाळातील माणसांच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्राधान्य देत आहे. यापुढेही येथील नागरिकांच्या समस्या निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. 

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सरस्वती केकान, पंचायत समिती सदस्य विलास मुळे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, डॉ. गोरे, बाळू पाटील, बिभीषण वनवे, गोरख शिंदे, बापू बरडे, दासाबापू बरे, भाऊसाहेब करगळ, नीलेश बुधवंत, सागर लोखंडे, बाळू पाटील, नाना वनवे, बंडू पवार, सागर जाभळे, बाळू लोखंडे, संतोष फुंदे, गणेश फुदे, सुरेश पवार आदी ग्रामस्थ व लिंबेवाडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Solapur Political News
Milk Rate
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Marathi News Esakal
www.esakal.com