esakal | ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्रा प्रतिकात्मक स्वरुपातच ! 10 जानेवारीपासून यात्रेस प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Gadda-Yatra1_20200114 (2).jpg

मंदिर समितीही सकारात्मक; प्रतिकात्मक स्वरूपातच यात्रा
ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेसंदर्भात महापालिका आयुक्‍त व पोलिस आयुक्‍तांच्या अभिप्रायासह प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. कोरोनामुळे यंदाची यात्रा प्रतिकात्मक स्वरुपातच करण्याचे नियोजित आहे. सद्यपरिस्थिती पाहता मंदिर समितीही प्रशासनासोबत असून यात्रेसंदर्भात काही दिवसांत वरिष्ठ स्तरावरुन निर्णय होईल.
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्रा प्रतिकात्मक स्वरुपातच ! 10 जानेवारीपासून यात्रेस प्रारंभ

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेस 10 जानेवारीपासून सुरवात होणार आहे. यंदा कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे यात्रा साजरी करणे अशक्‍य असल्याने कार्तिक वारीच्या धर्तीवर श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्राही प्रतिकात्मक स्वरुपातच पार पाडावी, असा अभिप्राय पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे व महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाला पाठविला आहे. तरीही यंदाची यात्रा प्रतिकात्मक स्वरुपातच केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मंदिर समितीही सकारात्मक; प्रतिकात्मक स्वरूपातच यात्रा
ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेसंदर्भात महापालिका आयुक्‍त व पोलिस आयुक्‍तांच्या अभिप्रायासह प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. कोरोनामुळे यंदाची यात्रा प्रतिकात्मक स्वरुपातच करण्याचे नियोजित आहे. सद्यपरिस्थिती पाहता मंदिर समितीही प्रशासनासोबत असून यात्रेसंदर्भात काही दिवसांत वरिष्ठ स्तरावरुन निर्णय होईल.
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी


दरवर्षी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथून श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी येतात. दरवर्षी तीन ते चार लाखांपर्यंत भाविक यात्रा काळात सोलापुरात येतात. मात्र, कोरोनामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घेत जिल्हा प्रशासनाने यंदाची पांडूरंगाची कार्तिकी वारी रद्द करुन प्रतिकात्मक वारी साजरी केली. आता श्री क्षेत्र बाळे येथील खंडोबाची यात्राही रद्दचा निर्णय घेतला. याच धर्तीवर आता ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्राही प्रतिकात्मकच साजरी केली जाणार आहे. दरम्यान, नंदीध्वज मिरवणूक, अक्षता सोहळ्यासह अन्य धार्मिक विधीसाठी सर्व मानकऱ्यांसह भाविकांनाही परवानगी द्यावी, होम मैदानावरील यात्रा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सामाजिक संघटनांसह अन्य काही राजकीय पक्षातील नेत्यांनी केली आहे. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसून यंदाची वारी दरवर्षीप्रमाणे नकोच, या भूमिकेवर प्रशासकीय अधिकारी ठाम आहेत. त्यावर आता राज्य सरकारचा विधी व न्याय विभाग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यात्रेचे नियोजित कार्यक्रम

  • शेटे वाड्यात योगदंडाची पूजा : 10 जानेवारी
  • 68 लिंगांना तैलाभिषेक : 12 जानेवारी
  • अक्षता सोहळा : 13 जानेवारी
  • हिरेहब्बू यांच्या घरातून नंदीध्वज प्रस्थान, होम हवन : 14 जानेवारी
  • हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज होम मैदानावर (शोभेचे दारुकाम) : 15 जानेवारी
  • कप्पडकळ्ळी (मल्लिकार्जून मंदिर) : 16 जानेवारी