मंगळवेढ्यातील ईदगाह मैदानावरील 400 वर्षांची परंपरा यंदा खंडित 

हुकुम मुलाणी 
सोमवार, 25 मे 2020

साध्या पद्धतीने ईद 
दरवर्षी मंगळवेढा तालुक्‍यात दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. परंतु कोरोनाचा दूध विक्रीसह बाजारपेठेतील रमजान खरेदीवरही लॉकडाउनचा परिणाम जाणवला. त्यामुळे मोठ्या उत्साहाऐवजी अगदी साध्या पद्धतीने ईद साजरी करावी लागली. 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या कडकडीत रोजाच्या समाप्तीनंतर मंगळवेढा ते सांगोला रस्त्यावरील औरंगजेबकालीन ईदगाह मैदानावरील नमाज पठणाची 400 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली. मुस्लिम बांधवांच्या अनुपस्थितीने यंदा ईदगाह मैदान यंदा सुनेसुने राहिले. 
शहरातील विविध प्रभागांत असलेल्या मशिदी व ईदगाह मैदानावर रमजान महिन्याच्या समाप्तीचे नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परंतु शासनाने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जमावबंदी व संचारबंदीचे आदेश दिल्यामुळे सध्या सर्वच धर्माच्या विविध सणांवर मोठी संक्रांत आली. त्यामुळे त्यांना आपले सण व विधी घरात साजरे करावे लागले. दरवर्षी तालुक्‍यात दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. परंतु कोरोनाचा दूध विक्रीसह बाजारपेठेतील रमजान खरेदीला याचा परिणाम जाणवला. त्यामुळे मोठ्या उत्साहाऐवजी अगदी साध्या पद्धतीने ईद साजरी करावी लागली. अशा परिस्थितीत शहर व ग्रामीण भागातील सिद्धापूर, मरवडे, डोणज, नंदूर, सलगर बुद्रूक, भोसे, नंदेश्‍वर, आंधळगाव, खुपसंगी, खोमनाळ, निंबोणी, बावची, मारोळी, लवंगी, हुन्नूर, गोणेवाडी, डोंगरगाव, ब्रह्मपुरी, माचणूर, लक्ष्मी दहिवडी, भाळवणी, रड्डे आदी गावांतील नागरिकांनी आपापल्या घरात नमाज पठाण करून चांगला पाऊस व पीकपाणीसह सध्या जगावर घोंघवणाऱ्या कोरोनापासून मुक्ती व सर्व समाजातील जनतेला सुखी ठेवण्याची दुवा अल्लाहकडे मागितली. रमजाननिमित्त आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, आवताडे स्पिनिंगचे संजय आवताडे, शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, "युटोपियन'चे उमेश परिचारक, "भैरवनाथ'चे अनिल सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, शीला शिवशरण, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे, सभापती प्रेरणा मासाळ, माजी सभापती प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ अवताडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्‍वर आवताडे यांच्यासह शशिकांत चव्हाण, तुकाराम कुदळे, ऍड. राहुल घुले, सतीश दत्तू, सुहास पवार, सुरेश पवार यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शिरखुर्मा व गुलगुल्याचा आस्वाद घेत मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year the 400 year old tradition of Eidgah Maidan on mangalwedha is broken