
सोलापूर,: अगदी लहानपणी तिसऱ्या वर्गात असताना भावाच्या शाळेत योगासन स्पर्धा पाहण्यासाठी गेल्यानंतर तिचे आयुष्याला योगाने वेगळेच वळण लावले. स्पर्धेतील पहिल्या बक्षिसाने मिळालेल्या आत्मविश्वासाने ती आंतरराष्ट्रीय योगपटू होऊ शकली. जुना विडी घरकूल भागातील रुचिता वलपा हिच्या यशाची ही आगळी कहाणी स्तिमित करणारी आहे.
सध्या हिराचंद नेमचंद महाविद्यालयातील विद्यार्थिनी व आंतरराष्ट्रीय योगपटू रुचिता राजेश वलपा हीने तिच्या योग क्षेत्रातील यशाचा प्रवास मांडला.
तिसरीला असताना एक दिवस माझ्या भावाच्या शाळेमध्ये योगासन स्पर्धा आयोजित केली होती. मी ही स्पर्धा पाहण्यासाठी गेले. तेव्हा योगासनाबद्दल फारशी माहिती नव्हती. त्या शाळेमध्ये योगासन स्पर्धा होते, म्हणून या शाळेमध्ये शिकण्याचा हट्ट पालकांकडे धरला. त्यानंतर दिगंबर जैन गुरुकुल गुरुकुल मध्ये माझा प्रवेश झाला. तेव्हापासून मी योगासने शिकण्यास सुरुवात केली. शाळेचे शिक्षक सुभाष उपासे यांनी मला योगासन शिकवायला सुरवात केली.
मला पहिली स्पर्धा सेवासदन प्रशालेमध्ये सहभागी होण्यासाठी मिळाली. तेथे सहा प्रकारची आसने करून दाखवायची होती. ही आसने मी चांगल्या पद्धतीने केल्याने मला पहिले एकशे एक रुपयाचे बक्षीस व पदक मिळाले. या स्पर्धेने मला आत्मविश्वास दिला आपण जो सराव करतो तो योगा स्पर्धेसाठी उपयुक्त आहे हे लक्षात आले. त्यानंतर जिल्हा व विभागावरील स्पर्धांमध्ये मी सहभाग घेऊ लागले.
सुरवातीपासून सरावात सातत्य ठेवल्याने स्पर्धामध्ये यश मिळणे अगदी नेहमीची बाब बनली. नाशिकला राष्ट्रीय स्पर्धेत आणि राज्याचे प्रतिनिधित्व केले तेव्हा तिला दुसरा क्रमांक मिळाला. तेथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्यानंतर मला सराव शिबिरासाठी बोलावण्यात आले. सराव शिबिर पूर्ण करून तेथूनच मलेशियाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. अगदी कमी वेळ असल्याने सराव वाढवला. आम्ही थायलंडला काही दिवस थांबून नंतर पुढे मलेशिया गेलो. मलेशियात सरावाची वेळ पहाटे तीनची होती. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
या सोबत राज्य, राष्ट्रीय स्पर्धासाठी बारामती, औरंगाबाद, नंदूरबार, ग्वाल्हेर आदी अनेक शहरात स्पर्धामध्ये सहभाग घेतला. शाळा सुटली व नंतर महाविद्यालयीन जीवनात देखील तीने योगासनामध्ये सातत्य ठेवले. अकरावीला कॉलेजला असताना नॅशनल स्कूल गेम मध्ये सहभाग घेतला. बीकॉम प्रथम वर्षात आल्यानंतर आयुष मंत्रालयाची योगा इन्स्ट्रक्टर ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. माझे कुटुंबीय आणि प्रशिक्षक सुभाष उपासे यांचे प्रोत्साहन प्रेरणादायी असते असेही रुचिता नमूद केले.
सराव करीत गेले तर यश नक्की मिळते
इयत्ता तिसरीपासून योगासन सरावाचा लाव मला कायम होत आला आहे. एकाच क्षेत्रात आपण सातत्याने सराव करीत गेले तर यश नक्की मिळते, असा अनुभव आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे मला मिळाला.
- रुचिता वलपा, आंतरराष्ट्रीय योगपटूृ सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.