युवक कॉंग्रेसतर्फे "रोजगार दो'साठी "मिस कॉल' आंदोलन 

श्‍याम जोशी 
Thursday, 10 September 2020

शहर युवक कॉंग्रेसतर्फे "रोजगार दो'च्या घोषणा देत "मिस कॉल' आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आले. 

सोलापूर : वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणामुळे कोट्यवधी नागरिक बेरोजगार झाले आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन नागरिकांसह युवकांच्या भविष्यासाठी मोदी सरकारने तत्काळ रोजगार निर्मिती करावी, यासाठी शहर युवक कॉंग्रेसतर्फे "रोजगार दो'च्या घोषणा देत "मिस कॉल' आंदोलन करण्यात आले. 

प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रात हे आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहर मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम यांच्या वतीने वालचंद कॉलेजजवळील गीतानगर येथे झालेल्या आंदोलनात शहर अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सुमीत भोसले, कार्याध्यक्ष ओंकार गायकवाड, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, सैफन शेख, राजासाब शेख, महांकाळी येलदी, संतोष अट्टेलूर, अजय सुगरे, मनोहर माचर्ला, संजय गायकवाड, किरण वल्लाल, उमर मुकेरी, नागेश म्याकल, शुभम यक्कलदेवी, सुभाष वाघमारे, सुशांत गायकवाड, धीरज सरवदे, आकाश बोन्द्रे यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. 

सोलापूर शहर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष विवेक कन्ना यांच्यातर्फे एसटी स्टॅंडसमोर आंदोलन झाले. या वेळी शहर सरचिटणीस महेश लोंढे, विधानसभा सरचिटणीस शरद गुमटे, मल्लू सलगरे, अतुल चव्हाण, अभिषेक गायकवाड, राजेन्द्र शिरकुल, धम्मदीप जगझाप, निखिल पवार, हर्षल कुर्ले, शिव कोरे, रोहन रास्ते, प्रशांत सरवदे, शुभम लोंढे, विवेक कसबे, विवेक डोलारे, अक्षय लोंढे, महेश होटकर, अमोल कस्तुरे उपस्थित होते. 

दक्षिण सोलापूर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष सैफन शेख यांच्यातर्फे स्वागतनगर येथे आंदोलन झाले. या वेळी उपाध्यक्ष सिकंदर सय्यद, महम्मद अली, काझी साब, यासीन शेख, किरण राठोड, इलियास जुबेरी, रशीद काझी आदिसह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress agitation for providing employment to the unemployed