"आम्ही लऊळकर'कडून हटके बर्थडे सेलिब्रेशन ! केकऐवजी फळे कापून केला शेतकऱ्यांच्या उत्पादनांचा सन्मान 

Fruit Cake
Fruit Cake
Updated on

कुर्डू (सोलापूर) : सध्या सोशल मीडियावर "वाढदिवसासाठी केक ऐवजी शेतातील फळे कापून वाढदिवस साजरा करा' हा ट्रेंड जोरात गाजत आहे; जेणेकरून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळांचा सन्मान होऊन त्यांची विक्री होईल. याचेच अनुकरण करून लऊळ (ता. माढा) येथील युवकांनी ती सत्यात उतरवली आणि कलिंगड व खरबूज या दोन फळांपासून अगदी जमेल तसा कापून केक बनवला अन्‌ आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला. समाजासमोर वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळाच फंडा निर्माण केला आहे. 

गावात "आम्ही लऊळकर' या व्हॉटसऍप ग्रुपमध्ये शेतकऱ्यांच्या पिकविलेल्या फळांविषयीची पोस्ट माजी उपसरपंच वसंत नलवडे यांनी पोस्ट केली. यावर ती सत्यात उतरविण्यासाठी नूतन उपसरपंच संजय लोकरे, सरपंच प्रतिनिधी प्रशांत बोडके, हॉटेल मालक सचिन गवळी, युवा उद्योजक विजय केदार, सुनील लोकरे यांनी काही वेळातच हा केक तयार केला. केक अगदी 70 रुपयांत तयार झाला. 

याचा दुसरा फायदा म्हणजे केक कापल्यानंतर तोच केक तोंडात भरवत चेहऱ्यावर लावण्याची सवय जीवलग मित्रांची असते, त्या आळा बसून उपवास असणारे व शाकाहारी मित्र केक खाण्यास नकार देतात, ते बंद होऊन फळांपासून बनवल्यामुळे सर्वांनी केक खाल्ला. 

बनवलेला केक हा सुंदर दिसत असल्याने हा नावीन्यपूर्ण केक पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली. उपस्थितांनी या फ्रूट केकचा आस्वाद घेतला. प्रत्येकाने यापुढे अशाच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला. नवीन पद्धत गावात प्रथमच सुरू झाल्याने सर्व मित्र कंपनीचे अभिनंदन केले. या पद्धतीने वाढदिवसाच्या खर्चाचे बजेट आटोक्‍यात आल्याने एरव्ही केकसाठी चारशे- पाचशे रुपये लागायचे, ते आता शंभर रुपयांत होऊ लागले. 

सध्या लॉकडाउनच्या चर्चेने शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांची कवडीमोल किंमत बाजारात होत असून, ती अत्यंत स्वस्त झाली आहेत. याची कल्पना सर्वसामान्य जनतेला नसते. बाजारात व्यापारी हीच फळे अव्वाच्या सव्वा किमतीला विकतो. शेतकऱ्यांकडून मात्र कवडीमोल भावाने खरेदी केली जातात. अशा कार्यक्रमांमुळे गावातील प्रत्येक कुटुंबाने कलिंगड, खरबूज, चिक्कू, द्राक्ष, पपई आदी फळे घरी दररोज खाण्यास सुरवात केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल. 
- संजय लोकरे, 
उपसरपंच, लऊळ, ता माढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com