यूथ टॅाक ऑन गांधी ; सत्य, अहिंसा, प्रेमाचा संदेश कायम प्रेरणादायी 

pruthvi gavli.jpg
pruthvi gavli.jpg
Updated on

सोलापूर ;  राष्ट्रपिता महात्मा गांधीजी केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील एक महान व उदात्त व्यक्‍तिमत्त्व आहेत. संपूर्ण मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा आहे. त्यांनी जगाला केवळ राजकीय तत्त्वज्ञानच दिले नाही, तर जगण्याचा मार्ग दाखवला. जे कधी गांधीजींना भेटले नाही, ते देखील त्यांच्या जीवनापासून प्रभावित झाले. मार्टिन ल्यूथर किंग जुनियर असो किंवा मग नेल्सन मंडेला यांच्या विचारांना आधार महात्मा गांधीजींचाच होता. बॅरिस्टर असूनही त्यांनी आजन्म सामान्य भारतीयांचा पेहराव अवलंबिला. यातून त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन आणि इतरांविषयी असलेला करूण भाव दिसून येतो, अशा भावना पृथ्वी गवळी यांनी व्यक्‍त केली. 
महात्मा गांधीजींचे जीवन हाच त्यांचा संदेश आहे. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रह या दोन शास्त्राचा वापर करून शेकडो वर्षापासून भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज समाजात हैराण करणाऱ्या गरिबी व बेरोजगारी या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी तेव्हाच विचार मांडले आहेत. स्वदेशी वस्तू वापरणे, त्यातून रोजगार निर्माण होणे आणि त्यातूनच राष्ट्रीय आर्थिक उन्नती होणे हे अगदी साधे, सरळ विचार त्यांनी मांडले. गांधीजींच्या याच विचारातून आज 'आत्मनिर्भर भारत योजना' ही संकल्पना उदयास आली. मानवता हाच खरा धर्म अशी त्यांनी शिकवण दिली. याचाच आदर्श घेऊन युवकांनी धर्म, जात, वंश, लिंग, भाषा, संस्कृती अशा बाबतीत संघर्ष न करता मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारून देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला पाहिजे. आजच्या तरुण पिढीसाठी महात्मा गांधीजींनी मांडलेला 'साधनसूचितेचा' विचारही महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते, "साध्य कितीही चांगलं असेल, पण कोणतेही साधनाचा अंगीकार करता कामा नये. साध्याप्रमाणेच साधनही योग्य असले पाहिजे. हा विचार युवकांसाठी बहुमूल्य ठरतो. तसेच त्यांचा "साक्षर होणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर ज्या शिक्षणामुळे स्वावलंबन निर्माण होते व आपला सर्वांगिण विकास होतो, ते खरे शिक्षण होय. हा शिक्षण विषयक विचारही युवकांसाठी प्रेरणादायी आहे. 

गांधीजींचा विचार... 

महात्मा गांधीजींचे जीवन हाच त्यांचा संदेश 
साधनसूचितेचा' विचारही महत्त्वाचा 
साध्याप्रमाणेच साधनही योग्य असले पाहिजे 


 शिक्षणाचा वापर सत्यासाठी व्हावा 
आजच्या तरुण पिढीने सर्वांगिण विकासावर आधारित शिक्षण शस्त्राचा वापर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी व सत्यासाठी करणे अपेक्षित आहे. अशाप्रकारे महात्मा गांधीजींचे संपूर्ण जीवन हेच युवकांसाठी प्रेरणादायी ठरते. महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या आचरणाचा आदर्श प्रत्येक युवकाने घेऊन स्वतःचा व देशाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. देशाची प्रगती करण्याची खरी जबाबदारी ही युवकांची असते. म्हणून युवकांनी या थोर महापुरुषांचा आदर्श घेऊन देशाचा विकास केला पाहिजे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com