कंटेनरच्या धडकेत मंगळवेढा व पंढरपूरच्या युवकांचा मृत्यू 

श्रीनिवास दुध्याल 
Monday, 9 November 2020

कंटेनरच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्य झाला. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे येथील सुयोग हॉटेलजवळ रविवारी (ता. 8) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. 

सोलापूर : कंटेनरच्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्य झाला. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे येथील सुयोग हॉटेलजवळ रविवारी (ता. 8) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. 

पंक्‍चर झालेल्या कारचे टायर खोलत असताना पाठीमागून वेगात आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने तुंगत (ता. पंढरपूर) येथील एकाचा व मंगळवेढा तालुक्‍यातील मानेवाडी येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी, सारंग प्रकाश रणदिवे (रा. तुंगत, ता. पंढरपूर) व संजय विठ्ठल अमंगे (रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा, सध्या रा. तुंगत, ता. पंढरपूर) हे लातूरहून तुंगतकडे आपल्या कारने (एमएच 13 - एझेड 7234) येत होते. या महामार्गावरील बाळे येथील सुयोग हॉटेलजवळ त्यांची कार पंक्‍चर झाली. हे दोघे कारच्या बाहेर येऊन कारचे टायर खोलत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक कंटेनरने (सीजी 04 एमपी 1457, कारच्या शेजारी उभे असलेल्या या दोघांना जोराची धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तुंगत व मानेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youths of Mangalvedha and Pandharpur killed in container collision