"झेडपी' शाळांमध्ये सुटीच्या काळात ऑनलाइन अभ्यास 

"झेडपी' शाळांमध्ये सुटीच्या काळात ऑनलाइन अभ्यास 
Updated on

सोलापूर ः कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केलेली आहे. सध्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. तरीही, जिल्हा परिषद शाळेतील अनेक गुरुजी सोशल मिडियाचा वापर करून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास करून घेत आहेत. त्याच माध्यमातून गृहपाठ पूर्ण करून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. 

शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशाप्रमाणे शिक्षक विविध सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहत आहे. त्याद्वारे त्यांचा अभ्यास करून घेणे, सराव करून घेण्याचे काम करत आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशाचे माळेवाडी-अकलूज (ता. माळशिरस) या शाळेच्या शिक्षकांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. 

मुख्याध्यापिका प्रभावती दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पालकांच्या व्हाट्‌सअप ग्रुपवर इयत्ता निहाय व विषय निहाय गृहपाठ, शब्दकोडे, लेखन, वाचन, पाढे पाठांतर, चित्र रेखाटन, निबंध स्पर्धा, प्रश्‍नोत्तरे या प्रकारचे गृहपाठ विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जात आहेत. 

शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक दिलीप वाघमारे, विजय अस्वरे, दत्तात्रय कोरे, बंडू खडतरे, ललितागौरी राणे, स्मिता कापसे, मनीषा पांढरे यांनी गृहपाठ सोडविण्याच्या या पारंपरिक पद्धतीला छेद देत ऑनलाइन चाचण्या सुरू केल्या आहेत. यासाठी गुगल फॉर्म व टेस्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विषय चाचण्या बनवून ग्रुप वर शेअर करतात. या चाचण्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या आहेत. यात प्रश्नोत्तरे, गणिती क्रिया यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. 

अशाप्रकारे मोबाईलचा सकारात्मक वापर करण्यात शिक्षक यशस्वी होत आहेत. ज्या पालकांकडे अँड्रॉइडचे मोबाईल नाहीत अशा पालकांसाठी एसएमएस सुविधा सुरू केली आहे. विद्यार्थी व पालक देखील या ऑनलाइन चाचण्यांचा आनंद घेत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A Thoughtful Gesture: 300 Guests Receive Dnyaneshwari Instead of Sarees
Close Equation on Display: MLA Kothe Chauffeurs CM Fadnavis
Devendra Fadnavis
Historic Ritual: Fadnavis Offers Mahapuja to Bhagwant for the First Time
Marathi News Esakal
www.esakal.com