महापालिका आयुक्‍तांचे आदेश! किरणा दुकानदारांसह पथविक्रेत्यांनी कोरोना टेस्टचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे

8728fab8d5c46be6d547d2d2d0b9aa09.jpg
8728fab8d5c46be6d547d2d2d0b9aa09.jpg

सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. शहरातील पथविक्रेते, फळ व भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, हात गाडीवाल्यांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आली आहे. तसे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

आयुक्‍तांच्या आदेशानुसार....

  • शहरातील प्रत्येक किरणा दुकानदारांनी करुन घ्यावी कोरोना टेस्ट
  • पथविक्रेते, फळ-भाजीपाला विक्रेत्यांसह हातगाडी चालकांनाही टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक
  • प्रमाणपत्र दुकानात न अडकविल्यास संबंधितांवर होणार फौजदारी कारवाई 
  • कोरोनाची रॅपिड तथा अन्य टेस्ट न करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचेही आदेशात आहे नमूद
  • कोरोना टेस्ट न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईसह प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड केला जाईल

शहरबातील सर्व विक्रेत्यांना कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे. त्यांच्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेत आता आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी नवे आदेश काढले आहेत. पुढील दहा दिवसांत सर्व विक्रेत्यांनी स्वतःची रॅपिड टेस्ट करून घ्यावी. कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागात अडकवावे, अशा सक्त सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. जे विक्रेते कोरोनाची टेस्ट करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याअंतर्गत संबंधितांचे परवाने रद्द केले जाणार आहे. तर प्रत्येकांना पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. सूचना तथा आदेश देऊनही त्यानुसार कार्यवाही न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई देखील केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com