#SaathChal गोंदवलेकर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

गोंदवले - डोईवर बरसत्या रिमझिम धारा... मुखी विठुमाउलीचा नारा... अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो वारकऱ्यांसह श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीने आज सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. गोंदवलेकरांनीही वेशीवर गळाभेट घेत मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांना निरोप दिला.

विठ्ठल- रुक्‍मिणी कुलदैवत असल्याने श्री ब्रह्मचैतन्य महाराज नेहमीच पंढरपूरची वारी करत. त्यामुळे येथील पायी दिंडीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षीच या दिंडीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. या दिंडीत सहभागी होण्यासाठी परगावच्या भाविकांनी कालपासूनच गोंदवल्यात हजेरी लावली होती. 

सकाळी साडेआठच्या सुमारास ‘श्रीं’च्या समाधी मंदिरात प्रतिमा व पादुकांचे विधिवत पूजन केल्यानंतर भाविकांनी श्रीरामाच्या जयघोषात सारा परिसर दणाणून सोडला. फुलांनी सजवलेल्या भव्य रथामध्ये समाधी मंदिर समितीच्या विश्‍वस्तांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिमा व पादुका विराजमान करण्यात आल्या अन्‌ पुन्हा श्रीराम नामाबरोबरच ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात दिंडी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाला. 

रथासमोर पताकाधारी व टाळकरी अभंगात तल्लीन होऊन नाचत होते. मोठ्या उत्साहात दिंडी पुढे सरकत होती. गावातील थोरले श्रीराम मंदिरात दिंडी विसावल्यानंतर पुन्हा सातारा-पंढरपूर रस्त्यावर आली. गावाच्या वेशीपर्यंत साथ दिल्यानंतर गावकऱ्यांनी गळाभेट घेऊन वारकऱ्यांना निरोप दिला.

दरम्यान, या पायी दिंडीत साताऱ्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आदी भागातून वारकरी सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी भाविकांनी नाष्टा व चहापानाची व्यवस्था केली होती. दिंडीचा आज म्हसवड येथे मुक्काम होणार आहे. पिलीव, भाळवणी, वाखरी येथे मुक्काम करून ही दिंडी नवमीला (शनिवारी) पंढरपुरातील श्री गोंदवलेकर महाराजांच्या इसबावी मठात पोचेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal palkhi wari godawalekar maharaj palkhi