आरेवाडीची बिरोबा यात्रा रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोणीही गर्दी जमवून कायदा सुव्यवस्था बिघडवीण्याचा प्रयत्न केला व कसलेही दुकान ऊघडे ठेवले, बकरे कापले तर कारवाई केली जाईल. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. असा इशारा तहसीलदार बी. जे. गोरे यांनी दीला. 

आरेवाडी येथील धुळोबाच्या मंदिरात प्रशासन, देवस्थान समिती व पुजारी यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी उपस्थित होते. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराद्य दैवत श्री बिरोबा देवाची यात्रा कोरोनामुळे रद्द होण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना घडली आहे. बिरोबा देवाची यात्रा पाडव्यापासून सुरु होते. पाडव्याच्या सातच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो यात्रास्थळी दरवर्षी सुमारे चार लाख भाविक हजेरी लावतात. सुमारे दहा हजार बकरी कापली जातात. 

तहसीलदार गोरे यांनी सांगितले आजपासून शुक्रवार (ता.20) मंदिराच्या आवारात असणारी सर्व नारळाची व इतर दुकाने तातडीने बंद करा,मंदिरातील दर्शन पुर्णपणे बंद ठेवा, देवाच्या विधिसाठी फक्त पाच व्यक्तींनाच मंदिरात थांबता येईल. मंदिर बंद असल्याचे चारी बाजूंना फलक लावा, बकरी कापण्यास मनाई आहे. येणारी आमावस्याही भरवली जाणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस पाटील, गावकामगार तलाठी, मंडलाधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांची असेल. यात्रेच्या मुख्य दिवशीच फक्त विधिसाठी पाच पुजार्याना परवानगी आहे. 

निरीक्षक आप्पासाहेब कोळी म्हणाले प्रशासन कोरोणा व्हायरसचा फैलाव जास्त वाढू नये म्हणून तुमच्यासाठी रात्रंदिवस झटत आहे. आणि तुम्ही जर प्रशासनाला सहकार्य केले नाही तर कोणालाही सोडले जाणार नाही. कायद्याचे उलंघ्घन केले तर गंभीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. 

प्रास्ताविक जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष वसंतरावकोळेकर यांनी केले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष रावसाहेब कोळेकर, जगन्नाथ कोळेकर, पोलिस पाटील रांमचंद्र पाटील, सरपंच आबासाहेब साबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सतिश कोळेकर, एन.टी.कोळेकर, भरमू कोळेकर मंडलाधिकारी एस.बी.कोळी, गावकामगार तलाठी कल्पना आंबेकर, काशिलिंग कोळेकर,पांडुरंग कोळेकर, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ārēvāḍīcī birōbā yātrā radda