
कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना १ लाख रुपये
बेळगाव : कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाकडून १ लाख रुपये आर्थिक भरपाई दिली जात आहे. बेळगाव तालुक्यात आतापर्यंत २१४ जणांना एक लाख रुपयांचा धनादेश तहसील कार्यालयाच्या माध्यमातून घरपोच करण्यात आला आहे.मार्च २०२० मध्ये बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला. बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १००१ जणांचा या आजाराच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपये दिले जात आहे. त्यानुसार मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी या भरपाईसाठी शासनाकडे अर्ज केलेला आहे. अर्जाची पडताळणी करण्यात आली असून त्यांना ही भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यापासून तहसिल कार्यालयात भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आतापर्यंत बेळगाव तहसील कार्यालयाच्या माध्यमातून बेळगाव तालुक्यातील २१४ जणांना भरपाईचा एक लाखाचा धनादेश देण्यात आला आहे. यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देखील डीबीटी तत्वावर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या बँक खात्यावर ५० हजार रुपयाची रक्कम जमा केली जात आहे.
कोरोना संसर्गामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक समस्येची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक ठिकाणी घरातील कर्ता व्यक्तीच कोरोणामुळे दगावली आहे. अशा कुटुंबांना शासनाकडून मिळणारी ही भरपाई आर्थिक समस्येतून सावरणारी ठरली आहे. अर्जाची पडताळणी करून पात्र कुटुंबांना ऐतिहासिक भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. या समितीच्या माध्यमातून कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ही मदत पोहोचविली जात आहे. अनेकाना थेट बँक खात्यावर भरपाईची रक्कम थेट जमा केली जात आहे. तर तहसिल कार्यालयाच्या माध्यमातून देखील धनादेशाच्या स्वरूपात ही आर्थिक मदत वितरित केली जात आहे.
प्रतिक्रिया
बेळगाव तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आतापर्यंत २१४ कुटुंबांना एक लाख रुपये भरपाईचा धनादेश देण्यात आला आहे. त्यासह जिल्हा प्रशासनाकडून काही कुटुंबियांना थेट त्यांच्या बँक खात्यावर देखील भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे.
-व्ही मोहन द्वितीय दर्जा तहसीलदार.
Web Title: 1 Lakh To Families Who Died Corona Infection
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..