दुधोंडी बनलेय हॉटस्पॉट : सख्या 18 वर, नागरिकांत भीती; कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

दुधोंडी येथे दिवसेंदिवस वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

दुधोंडी (जि. सांगली) : दुधोंडी येथे दिवसेंदिवस वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. हॉटस्पॉट बनलेल्या या गावातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे स्वॅब घेण्याची मोहीम आरोग्य विभागातर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. 

हॉटस्पॉट बनलेल्या दुधोंडी त कोरोना बाधितांची संख्या 18 वर गेली आहे. अगदी मार्चपासून एकही बाधित नसलेल्या गावात मुंबईहून आलेल्या दोघा पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याने 14 जून रोजी कोरोना चा शिरकाव झाला. आरोग्य विभागासह ग्रामपंचायतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र 27 रोजी पुन्हा 65 वर्षीय पुरुषाचा कोरोना आव्हाल पॉझिटिव्ह आला आणि बघता बघता रुग्णांची संख्या 18 वर पोचली.

मंगळवारी एका दिवसात 5 जणांना लागण झाल्याचे समजताच दुधोंडी ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. गावात शांतता असून, 28 दिवस सर्व व्यवहार पुन्हा बंद ठेवण्याच्या सूचना सरपंच विजय आरबुने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ नागराज रानमाळे यांनी दिले आहेत. सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असला तरीही त्याला प्रतिसाद देत आहेत. 

शेतीची कामे रखडली 
दुधोंडी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून सर्व रस्ते सील केल्याने शेतकऱ्यांना शेतीतील कामे करताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या ऊस लागणीसह अन्य कामांचे दिवस असून, शेतकऱ्यांना घरीच बसावे लागत आहे. त्यामुळे सर्व कामे खोळंबली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With 10 corona petaint Dudhondi Became Hotspot; fear among citizens; Strictly closed