Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

पाटण पाणीप्रश्नावर पालकमंत्री शंभुराज देसाईंचा नगर नेतृत्वाला चिमटा; ठेकेदार व अधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ काम मार्गी लावण्याच्या सूचना
"पुण्या-मुंबईत २ तासात पाईपलाईन दुरुस्त होते, मग पाटणमध्ये का नाही?" पालकमंत्री शंभुराज देसाईंचा पाटणकरांना नाव न घेता टोला; पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले

"पुण्या-मुंबईत २ तासात पाईपलाईन दुरुस्त होते, मग पाटणमध्ये का नाही?" पालकमंत्री शंभुराज देसाईंचा पाटणकरांना नाव न घेता टोला; पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले

sakal
Updated on

कऱ्हाड ः पाटण नगरपंचायत ज्यांच्या ताब्यात आहेत त्या नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एखादी पाईपलाईन फुटल्यास दोन-चार तासात दुरुस्त केली जाते. पाटण सारख्या ठिकाणी ते तात्पर्य का दाखवले जात नाही. त्यासाठी हिरेरीने काम करण्याची मानसिकता हवी असा टोला साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटणकर यांना नाव न घेता लगावला. पाटण नगर वासीयांना पाणी मिळाले पाहिजे, यासाठी मी ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ काम मार्गी लावण्याचे सूचना देणार असल्याचेही पालकमंत्री देसाई यानी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com