esakal | दहावीला 100 टक्के मार्क... सांगलीची छोरी कमाल कर गई 
sakal

बोलून बातमी शोधा

kadam

गंमत अशी, की ही अबोली भन्नाट कलाकार आहे. 3 मार्च 2020 ला दहावीची परीक्षा सुरु होणार होती. 28 फेब्रुवारीला भिलार या गावी राज्य शासनाचा मराठी दिनाचा कार्यक्रम होता आणि त्यात "भूपाळी ते भैरवी'ला निमंत्रण होते. मग काय, गेली आबोली तिकडे. छान कार्यक्रम केला.

दहावीला 100 टक्के मार्क... सांगलीची छोरी कमाल कर गई 

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः सकाळी फेसबूकला पालकमंत्री जयंत पाटील यांची पोस्ट वाचली आणि धक्काच बसला. जयंतरावांनी एका विद्यार्थीनीचं कौतुक केलं होते, की तिने दहावीला 100 टक्के गुण मिळवले... ही पोरगी जयंतरावांच्या मतदार संघातील असल्याने त्यांनी आवर्जून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर तिच्याशी थेट संपर्क साधला आणि तिच्या या थक्क करणाऱ्या लख्ख यशाबद्दल अभिनंदन केलं. तिच्याशी बोलताना "ही पोरगी कमाल आहे राव', अशीच कौतुकाची भावना मनात दाटून आली. 


अबोली संपत कदम असं या मुलीचं नाव. तिचं गाव तुंग... मिरज तालुक्‍यातील, सांगलीपासून आठ किलोमीटर अंतरावरचं. संपत कदम या अवलिया शिक्षकाची आणि एका हरहुन्नरी कलाकाराची ही लेक. "भूपाळी ते भैरवी' हा कार्यक्रम ज्यांनी पाहिलाय त्यांना संपत कदम हे नाव हमखास माहिती आहे. तर अबोली हीदेखील या कार्यक्रमात कलाकार म्हणून काम करते. तिला मराठीला 95, संस्कृतला 100, गणिताला 100, इंग्रजीला 95, विज्ञानला 99 तर समाजशास्त्राला 97 गुण मिळाले. शिवाय, तिनं कथ्थकच्या चार परीक्षा दिल्या आहेत. त्याचे जास्तीचे 10 बोनस गुण तिला मिळाले. ही सारी बेरीज झाली तब्बल 100 टक्के. स्वप्नातही येणार नाही असे गुण प्रत्यक्षात आले न भाऊ ! 


गंमत अशी, की ही अबोली भन्नाट कलाकार आहे. 3 मार्च 2020 ला दहावीची परीक्षा सुरु होणार होती. 28 फेब्रुवारीला भिलार या गावी राज्य शासनाचा मराठी दिनाचा कार्यक्रम होता आणि त्यात "भूपाळी ते भैरवी'ला निमंत्रण होते. मग काय, गेली आबोली तिकडे. छान कार्यक्रम केला. दोन दिवस मुक्काम आणि आली परत गावी. दोन दिवसांनी परीक्षेला हजर... तरीही 100 टक्के... याचं कारण सांगताना अबोली म्हणते, मी कधीच पहाटे लवकर उठून अभ्यास केला नाही, मी कधी रात्री उशीरापर्यंत जागले नाही. अभ्यासाचा अतिरेक तर नाहीच नाही. मी दिवसभर जास्त अभ्यास केला. मी शाळेला कधी कधीच जायचे. खाभिलार सगी शिकवण्या लावल्या होत्या, चार विषयांसाठी. स्वतः अभ्यास केला भरपूर... माझी पुरोहित कन्या शाळा सांगली माझ्या पाठीशी राहिली. त्यांनी मला मोकळीक दिली आणि हे यश मिळाले. 100 टक्के गुणांची खरचं अपेक्षा नव्हती. आता मिळालेत याचा आनंद तर खूप आहे. माझे शिक्षक, पालक यांच्या पाठबळाने हे शक्‍य झाले. मला डॉक्‍टर व्हायचे आहे, शिवाय एक चांगली कलाकारही. 

loading image