जिल्ह्यात आणखी 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू....दिवसभरात 225 रूग्ण आढळले...रूग्णसंख्येने 4 हजाराचा टप्पा ओलांडला 

घनशाम नवाथे
Friday, 7 August 2020

सांगली- जिल्ह्यात आज "कोरोना' चे नविन 225 रूग्ण आढळले. त्यापैकी 148 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. आजअखेर जिल्ह्यातील रूग्णसंख्या 4 हजार 199 वर पोहोचली आहे. आज जिल्ह्यातील 9 आणि परजिल्ह्यातील 2 अशा 11 जणांचा आज "कोरोना' मुळे मृत्यू झाला. तर दिलासादायक म्हणजे आज 106 जण कोरोनामुक्त झाले. 

सांगली- जिल्ह्यात आज "कोरोना' चे नविन 225 रूग्ण आढळले. त्यापैकी 148 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. आजअखेर जिल्ह्यातील रूग्णसंख्या 4 हजार 199 वर पोहोचली आहे. आज जिल्ह्यातील 9 आणि परजिल्ह्यातील 2 अशा 11 जणांचा आज "कोरोना' मुळे मृत्यू झाला. तर दिलासादायक म्हणजे आज 106 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यातील रूग्णसंख्येने आज चार हजाराचा टप्पा ओलांडून 4199 पर्यंत ती पोहोचली आहे. आज दिवसभरात आरटीपीसीआर तपासणीत 164 तर ऍन्टीजेन तपासणीत 66 रूग्ण "पॉझिटीव्ह' असल्याचे आढळले. एकुण 230 रूग्ण आढळले. त्यापैकी 225 जिल्ह्यातील तर पाचजण परजिल्ह्यातील आहेत. आजच्या 225 रूग्णसंख्येमध्ये महापालिका क्षेत्रात 148 रूग्ण आहेत. त्यापैकी सांगलीत 113 आणि मिरजेत 35 आहेत. तर ग्रामीण भागात आटपाडी तालुक्‍यात 4, जत तालुका 2, कडेगाव तालुका 5, कवठेमहांकाळ तालुका 3, खानापूर तालुका 4, मिरज तालुका 27, पलूस तालुका 13, शिराळा तालुका 5, तासगाव तालुका 7, वाळवा तालुका 7 याप्रमाणे रूग्ण आढळले. 

आज सांगलीतील खणभाग येथील 62 वर्षे महिला व 80 वर्षीय वृद्धा यांचा मृत्यू झाला. मिरजेतील 82 वर्षीय वृद्ध, तासगावातील 75 वर्षीय वृद्ध, आरवडे (ता.तासगाव) येथील 52 वर्षीय पुरूष, खंडेराजुरी (ता. मिरज) येथील 36 वर्षीय महिला, बालगाव (ता. जत) येथील 60 वर्षीय पुरूष, जत येथील 46 वर्षीय पुरूष आणि बामणोली (ता. मिरज) येथील 58 वर्षीय पुरूष अशा नऊ जणांचा मृत्यू झाला. तसेच अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील 50 वर्षीय पुरूष व जयसिंगपूर येथील 65 वर्षीय पुरूष अशा परजिल्ह्यातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला. आजअखेर जिल्ह्यात 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून परजिल्ह्यातील 42 जण देखील जिल्ह्यात उपचार घेत असताना मृत झाले आहेत. 
जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असली तरी 106 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे दिलासा मिळाला. सध्या 2289 रूग्ण उपचार घेत असून त्यापैकी 151 जण चिंताजनक आहेत. 
 

जिल्ह्यातील चित्र 
* आजअखेर पॉझिटीव्ह झालेले रूग्ण- 4199 
* उपचार घेत असलेले रूग्ण- 2289 
* आजअखेर बरे झालेले रूग्ण- 1783 
* आजअखेर जिल्ह्यातील मृत- 127 
* आजअखेर परजिल्ह्यातील मृत- 42 
* पॉझिटीव्हपैकी चिंताजनक- 151 
* आजअखेर ग्रामीण रूग्ण- 1359 
* आजअखेर शहरी रूग्ण- 298 
* महापालिका क्षेत्र- 2542 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 more died of corona in the district . 225 patients were found in a day . the number of patients crossed the 4,000 mark