सांगलीत दिवसभरात नवे 11 रुग्ण; 25 कोरोनामुक्त

शैलेश पेटकर
Thursday, 21 January 2021

जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले. 25 जण कोरोनामुक्त झाले. महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात पाच रुग्ण आढळून आले. बाधितांची संख्या 47 हजार 954 झाली. 

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले. 25 जण कोरोनामुक्त झाले. महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात पाच रुग्ण आढळून आले. बाधितांची संख्या 47 हजार 954 झाली. 

आज 200 जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यात सहा बाधित आढळला. 655 जणांची अँटीजेन तपासणी केली. त्यात पाच जण बाधित आढळले. आटपाडी तालुक्‍यात एक, जत तालुक्‍यात तीन, कवठेमहांकाळला एक, खानापूर तालुक्‍यात एक जणास बाधा झाली. महापालिका क्षेत्रातील सांगली शहरात तीन, तर मिरज शहारत दोघांना बाधा झाली. परजिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1537 इतकी आहे. त्यापैकी 1305 रुग्ण बरे झाले आहेत. गृहअलगीकरणात 104 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात 60 जण उपचार घेत आहेत. 

सध्याची स्थिती अशी ः आजचे बाधित ः 11, उपचाराखाली ः 172, बरे झालेले ः 46 हजार 037, मृत्यू ः 1745, बाधित ः 47 हजार 954, चिंताजनक 34, ग्रामीण बाधित ः 24 हजार 261, शहरी बाधित ः 7 हजार 151, मनपा क्षेत्रात बाधित 16 हजार 542. 

जिल्ह्यात आज 11 रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 हजार 954 झाली आहे. 

तालुकानिहाय कोरोनाबाधित 
आटपाडी : 2480 
जत : 2247 
कडेगाव : 2933 
कवठेमहांकाळ : 2468 
खानापूर : 2946 
मिरज : 4532 
पलूस : 2626 
शिराळा : 2291 
तासगाव : 3401 
वाळवा : 5488 
महापालिका : 16542

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 new patients in Sangli day; 25 coronal free