बेळगावातील 90 टक्के गावांना होणार आता 24 तास वीज पुरवठा

मिलिंद देसाई
Tuesday, 24 November 2020

बेळगाव तालुक्यातील 114 तर खानापूर तालुक्यातील 244 गावांना 24 तास वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट्य हेस्कॉमतर्फे ठेवण्यात आले आहे.

बेळगाव : निरंतर ज्योती वीज योजनेमुळे ग्रामीण भागात 24 वीज पुरवठ्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे चित्र ग्रामीण भागातील अनेक गावात पहावयास मिळत असून बेळगाव तालुक्यातील 114 तर खानापूर तालुक्यातील 244 गावांना 24 तास वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट्य हेस्कॉमतर्फे ठेवण्यात आले आहे. यापैकी 90 टक्के गावांना 24 तास वीज पुरवठा होत आहे. तर उर्वरीत गावांनाही लवकरच वीज पुरवठा केला जाणार आहे. 

ग्रामीण भागातील जनतेला नेहमीच भारनियमनाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात 10 ते 12 तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने अधिक तास वीज देण्याची मागणी ग्रामीण भागातून सातत्याने होत असते. याची दखल घेत गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात निरंतर ज्योती योजनेंतर्गत 24 तास वीज पुरवठा करण्याचे काम हेस्कॉमतर्फे हाती घेण्यात आले होते. 

हेही वाचा -  मुश्रीफ, घाटगे, मंडलिक म्हणजे अमर, अकबर, ऍन्थनी ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

 

पहिल्या टप्प्यात बेळगाव तालुक्यातील 114 गावांमध्ये निरंतर ज्योती योजना राबविण्यात आली. त्यामुळे 114 गावातील भारनियमन पूर्ण पणे बंद झाले आहे. त्याच प्रमाणे खानापूर तालुक्यात सर्वाधिक गावांना 24 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेत काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार 244 गावांना योजनेचा लाभ झाला असून खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात असून देखील 244 गावांपैकी 90 टक्क्यांहून अधिक गावांना 24 तास वीज पुरवठा होत आहे. योजनेमुळे हेस्कॉमच्या महसुलातही मोठी झाली असून अनेक वर्षे भारनियमनामुळे त्रास सहन लागणाऱ्या जनतेला मोठा दिलास मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लहान मोठ्या व्यावसाईकांनाही योजना लाभदायक ठरत असून इतर गावातही लवकरच योजना लागू करावी अशी मागणी होऊ लागली आहे. 

"निरंतर ज्योती योजना हाती घेण्यात आल्यापासून 3 वर्षांपासून खानापूरातील 244 तर बेळगावातील 114 गावांना 24 तास सिंगल फेज वीज पुरवठा केला जात आहे तर कृषी पंपसाठी 7 तास वीज उपलब्ध करून दिली जात आहे."

- प्रवीणकुमार चिकार्डे, सहायक कार्यकारी अभियंता

हेही वाचा - मुश्रीफ, घाटगे, मंडलिक म्हणजे अमर, अकबर, ऍन्थनी ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

"यापूर्वी गावात अनेकदा वीज जात होती मात्र निरंतर ज्योती योजना सुरू झाल्यापासून अनेक महिन्यांपासून सुरळीत वीज पुरवठा होत आहे त्यामुळे व्यापारी वर्गासह इतर व्यावसाईकानाही लाभ होत आहे." 

- साईश सुतार, ग्रामस्थ हलशी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 114 rural village area provide 24 hours electricity supply in belgaum under the policy of government in belgaum