तूर, हरभऱ्याचे साडेअकराशे कोटी मिळेनात 

तात्या लांडगे
सोमवार, 18 जून 2018

सोलापूर : नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव, कर्जमाफीचा पत्ता नाही, साखर कारखान्यांकडून एफआरपीचे पैसे नाहीत, त्यातच हमीभावाने विकलेल्या हरभरा व तुरीचे पैसेही वेळेवर नाहीत. या कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही तब्बल दोन लाख शेतकऱ्यांना तूर व हरभऱ्याचे एक हजार 147 कोटी रुपये मिळालेले नाहीत. 

सध्या पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या मशागतीला जोर आला आहे. परंतु, मशागत, खते व बी-बियाणे यासह अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना हक्‍काचे पैसे मिळेनात. तुरीचे पैसे बहुतांश शेतकऱ्यांना मिळाले. परंतु, 1 मार्च ते 13 जून या कालावधीत हमीभावाने खरेदी केलेल्या हरभऱ्याची रक्‍कम सुमारे एक लाख शेतकऱ्यांना मिळालीच नाही. तसेच सुमारे पावणेदोन लाख शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा अद्यापही हमीभावाने खरेदी झालेला नाही. ज्या-ज्या शेतकऱ्याची तूर हमीभावाने खरेदी झालेली नाही. त्यांना राज्य शासनाकडून प्रतिक्‍विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. परंतु, अद्यापही बहुतांशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत खासगी सावकाराचे दार ठोठावण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. याबाबतीत सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. 

आकडे बोलतात... 
तूर नोंदणी शेतकरी 
4,58,306 
हमीभावाने तूर खरेदी 
25,87,916 क्‍विंटल 
वाटप केलेली रक्‍कम 
967.75 कोटी 
न मिळालेली रक्‍कम 
430 कोटी 
शिल्लक शेतकरी 
1,81,447 

हरभरा नोंदणी शेतकरी 
3,02,728 
हमीभावाने हरभरा खरेदी 
19,02,000 क्‍विंटल 
न मिळालेली रक्‍कम 
717.88 कोटी 
शिल्लक शेतकरी 
1,42,028

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11.5 crore of chana and pulse till not received