राज्यातील 119 साखर कारखान्यांना विजेचा आधार 

तात्या लांडगे
सोमवार, 9 जुलै 2018

सोलापूर - मागील वर्षात राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी साखरेसह विजेची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली. बाजारात साखरेचे दर दिवसेंदिवस घसरत असल्याने चिंतेत असलेल्या कारखानदारांना विजेतून मिळणाऱ्या रकमेमुळे आधार मिळाला आहे. कारखान्यांनी तयार केलेल्या विजेपोटी त्यांना महावितरणकडून दोन हजार 28 कोटी रुपये टप्प्याटप्यात दिले जात आहेत. जुलैपर्यंत संपूर्ण रक्‍कम दिली जाणर असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

मागील हंगामात राज्यातील 150 साखर कारखान्यांनी नऊ लाख हेक्‍टरवरच्या उसाचे गाळप केले. त्यातून तब्बल 160 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. उत्पादन खर्च आणि बाजारातील साखेरचे दर याचे अर्थकारण विस्कटल्याने बहुतांश साखर सध्या कारखान्यांकडे शिल्लकच आहे. मात्र, साखरेबरोबरच कारखान्यांनी केलेल्या अन्य उत्पादनामुळे साखर कारखान्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत. कारखान्यांनी तयार केलेली विजेला महावितरणकडून प्रती युनिट सरासरी पाच ते सहा रुपयांचा दर दिला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एफआरपीची रक्‍कम मिळण्याची आशा आहे. पेट्रोल पंपावर इथेनॉलच्या थेट विक्रीला परवानगी द्यावी, अशी अपेक्षा कारखानदारांनी "सकाळ'च्या माध्यमातून सरकारकडे व्यक्‍त केली आहे. 

महावितरणकडून काही कारखान्यांना प्रति युनिट 6.44 रुपये तर काहींना 4.95 रुपये दर दिला जातो. आता सौरऊर्जेच्या उपलब्धतेमुळे कारखान्यांकडील वीज कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. परंतु, कारखान्यांसमोरच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या पुढाकारातून महावितरणकडून प्रति युनिट साडेसहा रुपयांचा दर अपेक्षित आहे. 
- उमेश परिचारक, युटोपियन शुगर, पंढरपूर 

आकडे बोलतात... 
साखर कारखाने - 119 
तयार केलेली वीज  - 338 
कोटी युनिट मिळणारी रक्‍कम - 2,028 कोटी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 119 sugar factories will get benefit from electricity