Miraj : टेंपो-विजेच्या खांबात अडकल्याने मिरजेत बारा वर्षांच्या मुलीचा मृत्यू; मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद
Sangli News : रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. संशयित जमादार याने कृष्णाघाट रस्त्यावर असलेल्या लक्ष्मीनगर येथील नमरा मस्जिदजवळ विकत घेतलेले जळण भरले होते. या वेळी ही घटना घडली.
A tragic accident in Miraj results in the death of a 12-year-old girl after a tempo becomes entangled in an electric pole. Police have registered a complaint.Sakal
मिरज : शहरातील कृष्णाघाट रस्त्यावर लाकडाने भरलेला टेंपो मागे घेत असताना विजेचा खांब आणि टेंपोमध्ये अडकल्याने मुलीचा मृत्यू झाला. राबिया हाजी जातकर (वय १२, कुडची ता. रायबाग, जि. बेळगाव) असे मृत मुलीचे नाव आहे.