राज्यात यंदा सव्वाकोटी क्‍विंटल तुरीचे उत्पादन 

तात्या लांडगे
बुधवार, 27 जून 2018

सोलापूर : राज्यात यावर्षी राज्यात 12 लाख 47 हजार हेक्‍टरवर तुरीची पेरणी अपेक्षित आहे. त्यातून सुमारे एक कोटी 20 लाख क्‍विंटल तुरीचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता वाढली आहे. 
राज्य सरकारने शेतकऱ्यांकडील तूर 5400 रुपये या हमीभावाने खरेदी केली. परंतु, सध्या राज्यातील वखार महामंडळासह सर्व शासकीय गोदांमध्ये तूर व हरभरा, उडीद आणि मूग यातून तुडूंब भरली आहेत.

शेतमाल साठविण्यासाठी अनेक ठिकाणी भाड्याची गोदामे घेतली आहेत. बाजारात तुरीसह आणि डाळीलासुध्दा मागणी नसल्याने सरकारने डाळीचे दर 50 रुपयांवरुन 35 रुपये केले आहेत. तरीही डाळ विकली जात नाही. आता आगामी वर्षातील उत्पादित तूर साठवायची कुठे याची चिंता सरकारला लागल्याची चर्चा आहे. 

आकडे बोलतात... 
खरीप हंगामातील पिकनिहाय क्षेत्र 

तूर 
13.47 लाख हेक्‍टर 
तूरीचे उत्पादन 
1.20 कोटी क्‍विंटल 
ज्वारीचे क्षेत्र 
7.19 लाख हेक्‍टर 
मूग 
3.97 लाख हेक्‍टर 
उडीद 
3.19 लाख हेक्‍टर 

सरकारपुढे गोदामांचा प्रश्‍न 
राज्यात वखार महामंडळाची आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनची गोदामे मागील दोन वर्षातील तूर, हरभरा, मका, उडीद आणि मूग या शेतमालाने तुडूंब भरली आहेत. गोदामाअभावी यावर्षी सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा खरेदी होऊ शकला नाही. त्यामुळे राज्य सरकार त्या शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. त्यातच पुन्हा यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने गोदामांची उपलब्धता हा मोठा प्रश्‍न सध्या सरकारपुढे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1.25 crore production of pulse in state