बेळगावात सापडले आणखी 13 कोरोना पॉझिटिव्ह.... 

13 corona positive  found in Belgaum
13 corona positive found in Belgaum

बेळगाव  : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आजपरत वाढला. नव्या 13 रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 135 वर पोचला. सर्व बाधित झारखंड शिखरजी देवदर्शन घेऊन परतले आहेत. अथणी तालुक्‍यात सवदी, नंदगावी, बेळवंकी, झुंजरवाडला क्वारंटाईन होते. 

जिल्ह्यात चार दिवसांत 23 जणांना डिस्चार्ज दिला. त्यामुळे दिलासा मिळाला. मात्र, आज परत चिंता वाढली. क्वारंटाईनमधील 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.. एप्रिल महिन्यांमध्ये अथणी तालुक्‍यातील भाविक झारखंडला शिखरजी दर्शनाला गेले होते. अथणी तालुक्‍यात सवदी, नंदगाव, बेळवंकी, झुंजरवाड आणि हुक्केरीत क्वारंटाईन केंद्रात भाविक होते. या दरम्यान घशातील स्वॅब घेऊन प्रयोगशाळेला पाठविले. त्यापैकी काहींचा याआधी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये आज 13 जणांची भर पडली. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 135 वर पोचला. 

बाधितांपैकी सात पुरुष आहेत. त्यांचे अनुक्रमे वय 35, 32, 56, 43, 39, 38 आहे. सात महिलांना कोरोना लागण झाली आहे. त्यांचे अनुक्रमे वय 27, 39, 38, 38, 27, 17, 28 आहे. एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 93 आहे. एका महिलेचा मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 41 वर पोचली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com