esakal | निजामुद्दीनमधून इतके दिल्लीकर स्वगृही
sakal

बोलून बातमी शोधा

131 passengers from Nizamuddin to Delhi Home, while 164 left for Karnataka

दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन स्थानकातून कर्नाटकातील यशवंतपुरला जाणारी संपर्क क्रांती ऐक्‍सप्रेस तब्बल वीस तासांच्या प्रवासानंतर सायंकाळी चार वाजता मिरज स्थानकात दाखल झाली.

निजामुद्दीनमधून इतके दिल्लीकर स्वगृही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मिरज (जि. सांगली) ः दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन स्थानकातून कर्नाटकातील यशवंतपुरला जाणारी संपर्क क्रांती ऐक्‍सप्रेस तब्बल वीस तासांच्या प्रवासानंतर सायंकाळी चार वाजता मिरज स्थानकात दाखल झाली. यावेळी संपर्कक्रांती गाडीतून जिल्ह्यातील 131 प्रवासी स्वगृही परतले. तर 164 प्रवासी कर्नाटकाकडे रवाना झाले. यावेळी दिल्लीहून मिरज स्थानकात दाखल झालेल्या 131 प्रवाशांचे थर्मल स्कॅनिग करून प्रवाशांना होमक्वारंटाईनचे शिक्के मारले जात होते. 

यावेळी दिल्लीहून संपर्क क्रांती ऐक्‍सप्रेसमधून आलेल्या 131 प्रवाशांपैकी दोन कुटूंबातील चार बालकांना तापाची तीव्र लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांना शहरातील कोरोना रूग्णालयात रूग्णावाहिकेतून दाखल करण्यात आले. त्यांच्या स्वॅबचे नुमने घेऊन पुढील वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून यावेळी देण्यात आली.

तसेच कोरोना रूग्णालयात दाखल झालेल्या बालकांच्या कुटूंबाची देखिल तपासणी केली जाणार आहे. शिवाय या सर्व 131 प्रवाशांची नियमित तपासणी आरोग्य विभागाकडून होणार आहे. 

मिरजेत आलेल्या प्रवाशांची अशी होते तपासणी 
सध्या मिरजेत गोवा ऐक्‍सप्रेस नियमित धावते तर संपर्क क्रांती ऐक्‍सप्रेस आठवड्यातून एकदा धावते. या दोन्ही गाड्या मिरजेत दाखल झाल्यावर तिकीट तपासणीसांकडून तिकीटांची तपासणी केली जाते तर आरोग्य विभागाकडून थर्मल स्कॅनिंग, सर्दी, ताप, खोकला, घसा खव-खवणे आदि प्राथमिक तपासण्या करूनच होमक्वारंटाईन केले जाते. 

loading image
go to top