
मिरज : कर्नाटकातील कागवाड येथून मिरज तालुक्यात येत असलेला तब्बल १४ लाख २० हजार रुपयांचा गुटखा साठा पोलिसांनी सापळा लावून जप्त केला. चिदानंद चंद्रशेखर नेसरगी (वय ४८, रा. कुडची ता. रायबाग, जि. बेळगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी सात लाख रुपयांच्या ट्रकसह गुटखा साठा असा २१ लाख २५ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.