
टेंभुर्णी : सशस्त्र सीमा बल मधील जवानाच्या मुलाने अज्ञात कारणावरुन घरातील वडीलांच्या रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. माढा तालुक्यातील आढेगांव येथे सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्या पूर्वी ही घटना घडली असून श्रीधर गणेश नष्टे ( वय -14 रा. आढेगांव ता.माढा ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.