esakal | सांगली जिल्ह्यातील 141 शाळा बनणार "मॉडेल स्कूल'
sakal

बोलून बातमी शोधा

141 schools to be 'model schools' in Sangli district

सांगली जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 141 शाळांची निवड मॉडेल स्कूल उपक्रमासाठी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील 141 शाळा बनणार "मॉडेल स्कूल'

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 141 शाळांची निवड मॉडेल स्कूल उपक्रमासाठी केली आहे. त्याची घोषणा करण्यात आली असून या शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा सुधारण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले जाणार आहे. शैक्षणिक विकासाची ही चळवळ बनवण्याचा निर्धार मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केला आहे.

मॉडेल स्कूल उपक्रमात या शाळांच्या भौतिक सुविधांचा विकास करण्यासाठी विविध योजना शाळांशी जोडल्या जाणार आहेत. त्यात नवीन वर्गखोल्या, इमारत दुरुस्ती, मैदान बनवणे, ग्रंथालय बनवणे, बोलक्‍या भिंती, कुंपनभिंत, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय, विविध शैक्षणिक उपक्रम राबवणे, स्पर्धात्मक परीक्षेसाठीची विशेष तयारी करणे असे कार्यक्रम असतील. या कामांना प्राधान्य देऊन बांधकाम, ग्रापंचायत विभागांनी विविध योजनांचा निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यामुळे सर्व विभाग या योजनेशी जोडण्यात येत आहेत. 

पालकमंत्री जयंत पाटील यांनी या योजनेचे कौतुक केले असून राज्य शासनाकडूनही अधिकाधिक सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. या कामात ग्रामस्थांनी वेळ, पैसे आणि श्रम देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जितेंद्र डुडी यांनी केले आहे. प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी राहुल गावडे यांनी उपक्रमात सर्व शिक्षकांसह शाळा समिती, ग्रामस्थांच्या शंभर टक्के सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. 

शिक्षण विकासाची चळवळ बनवूया

मॉडेल शाळा उपक्रमातून पायाभूत सुविधांचा विकास करणारच आहोत, त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. या उपक्रमात शिक्षक गांभीर्याने सहभागी होतील, गावकऱ्यांनीही त्याला सहकार्य करावे. ही शिक्षण विकासाची चळवळ बनवूया.

- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी. 

तालुकानिहाय निवडलेल्या शाळा 

  • आटपाडी तालुका ः बनपुरी, शेटफळे, दिघंची, साळशिंगमळा, निंबवडे, आटपाडी, लेंगरेवाडी, पिंपरी बुद्रुक, घरनिकी, वलवण, नेलकरंजी, हिवतड, बोंबेवाडी, पुजारवाडी. 
  • जत तालुका ः अचकनहळ्ळी, उमराणी कन्नड, वायफळे, बिरनाळ, बाज, मिरवाड, लोहगाव, वाळेखिंडी, शेगाव, लकडेवाडी, सनमडी, काराजनगी, आसंगी (मराठी), वळसंग, उटगी, उमदी, हळ्ळी (कन्नड), अंकलगी (कन्नड मुली), भिवर्गी (मराठी), मोरबगी (कन्नड), कोंत्याव बोबलाद, दरीबडची (कन्नड), आसंगी तुर्क (मराठी), जत नं. 1, साळगेवाडी, मुचंडी (कन्नड), बिळूर (मराठी), बसरगी (कन्नड), कुंभारी. 
  • कवठेमहांकाळ तालुका ः खरशिंग, कोंगनोळी, हिंगणगाव, रायवाडी, निमज, आरेवाडी, ढालेवाडी, नांगोळे, कवठेमहांकाळ 1 व 3, रांजणी, बोरगाव. 
  • खानापूर तालुका ः भाळवणी, बलवडी, खानापूर, सुलतानगादे, नागेवाडी, बामणी, भेंडवडे, भूड, रेणावी, खंबाळे भाळवणी, गार्डी घानवड. 
  • मिरज तालुका ः लक्ष्मीवाडी आरग, ढवळी, बुधगाव, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, कवठेपिरान, बामणोली, कवलापूर, सिद्धेवाडी, मालगाव, शिपूर, एरंडोली नं. 1, बेडग, खटाव, माधवनगर 2. 
  • पलूस तालुका ः माळवाडी, ब्रह्मनाळ, नागठाणे, बांबवडे, सावंतपूर, आमणापूर, नागराळे, घोगाव, 
  • शिराळा तालुका ः पाडळी, आरळा, किनरेवाडी, नाठवडे, रांजणवाडी, चिंचोली, मांगरूळ, पणुंब्रे तर्फ शिराळा, निगडी, अंत्री खुर्द, बिऊर, नाटोली, मांगले, मणदूर, चिखली. 
  • तासगाव तालुका ः पेड, आळते, मांजर्डे, विसापूर, बिरणवाडी, वडगाव, सावळज, मणेराजुरी, धुळगाव, चिंचणी, नेहरूनगर, कामेरी. 
  • वाळवा तालुका ः कुंडलवाडी (उर्दू), महादेवनगर, भडकंबे, बागणी, कासेगाव, नेर्ले, नरसिंहपूर, रेठरेहरणाक्ष, हुबालवाडी, ओझर्डे, कार्वे, कुरळप, येडेनिपाणी, माळेवाडी, नवेखेड, वाळवा नं. 2, कारंदवाडी, आष्टा नं. 9, इस्लामपूर नं. 1, आंबेगाव, 
  • कडेगाव तालुका ः कडेगाव, हिंगणगाव खुर्द, शिवाजीनगर, खेराडेवांगी, देवराष्ट्रे, अंबक. 

संपादन : युवराज यादव