जिल्ह्यात दिवसात 15 कोरोनामुक्त, नवे 23 रूग्ण 

15 coronal free, 23 new patients per day in the district
15 coronal free, 23 new patients per day in the district
Updated on

सांगली : जिल्ह्यात आज दिवसात झालेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचणीत 23 रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळले. आज कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज आणि वाळवा तालुक्‍यात एकही रूग्ण आढळला नाही. तर दिवसभरात 15 जण कोरोनामुक्त झाले. 

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला यश आले आहे. काही दिवसापासून रोज तीसच्या खाली रूग्णसंख्या आढळत आहे. आजदेखील दिवसात आरटीपीसीआर चाचणीत 262 पैकी 13 रूग्ण बाधित आढळले. ऍन्टीजेन चाचणीत 661 पैकी 12 बाधित आढळले. दोन्ही चाचण्यांत 25 जण बाधित आढळले. त्यापैकी जिल्ह्यातील 23 आणि सोलापूर जिल्ह्यातील दोन रूग्ण आहेत. 

आजच्या कोरोना बाधितांपैकी 6 जण महापालिका क्षेत्रातील आहेत. सहाही जण सांगलीतील आहेत. ग्रामीण विभागात आटपाडी 6, जत 6, कडेगाव 1, पलूस 1, शिराळा 1, तासगाव 2 याप्रमाणे रूग्ण आढळले. उर्वरीत चार तालुक्‍यांत एकही रूग्ण न आढळल्यामुळे दिलासा मिळाला. 

सध्या 194 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 92 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आणि 102 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रूग्णांलयातील दाखलपैकी 41 जण चिंताजनक आहेत. चिंताजनकपैकी 33 जण ऑक्‍सिजनवर आणि 8 रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. आज दिवसात 15 जण कोरोनामुक्त झाले. दिवसांत एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला. 

जिल्ह्यातील चित्र- 
आजअखेर बाधित रूग्ण- 47475 
आजअखेर कोरोनामुक्त- 45554 
सध्या उपचार घेणारे रूग्ण- 194 
आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1727 
परजिल्ह्यातील मृत रूग्ण- 217 
आजअखेर ग्रामीण रूग्ण- 23997 
आजअखेर शहरी रूग्ण- 7040 
महापालिका क्षेत्र रूग्ण- 16438 
...


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com