जिल्ह्यात दोन दिवसात 1503 नवे रूग्ण... 50 जणांचा मृत्यू : 571 जण कोरोनामुक्त 

घनश्‍याम नवाथे
Wednesday, 2 September 2020

सांगली-  जिल्ह्यात दोन दिवसात 1503 कोरोना बाधित रूग्ण आढळले. तर दोन दिवसात कोरोनामुळे 50 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 3 रूग्ण परजिल्ह्यातील आहेत. जिल्ह्याची आजअखेरची रूग्णसंख्या 13897 इतकी झाली आहे. दोन दिवसात 571 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

सांगली-  जिल्ह्यात दोन दिवसात 1503 कोरोना बाधित रूग्ण आढळले. तर दोन दिवसात कोरोनामुळे 50 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 3 रूग्ण परजिल्ह्यातील आहेत. जिल्ह्याची आजअखेरची रूग्णसंख्या 13897 इतकी झाली आहे. दोन दिवसात 571 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात गेले दोन दिवस सातशेच्या पटीत रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाण देखील वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता.1) दिवसभरात 768 इतके कोरोना बाधित रूग्ण आढळले होते. त्यापैकी 264 रूग्ण महापालिका क्षेत्रातील होते. तर उर्वरीत 504 रूग्ण ग्रामीण भागातील होते. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच कराड व हातकणंगले येथील रूग्णांचा देखील मृत्यू झाला. तसेच मंगळवारी 331 जण कोरोनामुक्त झाले. 
आज जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासणीत 249 आणि ऍन्टीजेन तपासणीत 513 असे एकुण 762 रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळले. यापैकी 735 रूग्ण जिल्ह्यातील आणि 27 रूग्ण परजिल्ह्यातील आहेत. दिवसभरात आढळलेल्या 735 रूग्णांपैकी 333 महापालिका क्षेत्रातील आहेत. त्यामध्ये सांगलीतील 190 आणि मिरजेतील 143 आहेत. तसेच ग्रामीण भागात आटपाडी तालुका 32, जत 10, कडेगाव 24, कवठेमहांकाळ 44, खानापूर 32, मिरज 60, पलूस 52, शिराळा 34, तासगाव 46, वाळवा 68 याप्रमाणे तालुक्‍यात रूग्ण आढळले. 

आज दिवसभरात जिल्ह्यातील 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये सांगलीतील तीन, मिरजेतील चार, जत येथील तीन, हिंगणगाव, तानंग, बेडग, येळावी, कुपवाड, आरेवाडी, निंबवडे, आष्टा, काकडवाडी, नवेखेड, शिंगटेवाडी, वासुंबे, कासेगाव येथील प्रत्येकी एक रूग्ण यांचा समावेश आहे. तसेच कार्वे (कराड) येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील 542 जण आणि परजिल्ह्यातील 106 जण कोरोनामुळे मृत झाले आहेत. तर जिल्ह्यात आज दिवसभरात 240 जण कोरोनामुक्त झाले. 
जिल्ह्यात सद्यस्थितीत 616 रूग्ण चिंताजनक आहेत. त्यापैकी 530 ऑक्‍सिजनवर आणि इतर व्हेंटीलेटरवर आहेत. सध्या 5428 रूग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 3194 होम आयसोलेशन रूग्ण आहेत. 
 

जिल्ह्यातील चित्र- 

 • आजअखेरचे पॉझिटीव्ह रूग्ण-13897 
 • उपचार घेत असलेले रूग्ण- 5428 
 • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 7927 
 • आजअखेर जिल्ह्यातील मृत-542 
 • आजअखेर परजिल्ह्यातील मृत- 106 
 • पॉझिटीव्हपैकी चिंताजनक- 616 
 • आजअखेर ग्रामीण रूग्ण- 5305 
 • शहरी भागातील रूग्ण- 1506 
 • महापालिका क्षेत्रातील रूग्ण- 7086 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1503 new patients in two days in the district. 50 deaths: 571 corona free