दिवसभरात 16 रूग्ण..."हॉटस्पॉट' बिळूरमध्ये आणखी सहा रूग्ण, दुधोंडीत पाच रूग्ण...तासगाव, ब्रह्मनाळमध्ये प्रत्येकी दोन, अथणीतील एक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सांगली - जिल्ह्यात आज आणखी 16 जणांना "कोरोना' ची लागण झाली. जत तालुक्‍यातील "हॉटस्पॉट' असलेल्या बिळूरमध्ये सहाजण, दुधोंडी (ता. पलूस) मध्ये पाच, तासगाव आणि ब्रह्मनाळ (ता. पलूस) मध्ये प्रत्येकी दोन आणि अथणी (जि. बेळगाव) येथून मिरजेत आलेला रूग्ण यांचा समावेश आहे. आज दिवसभरात 16 रूग्ण वाढले असून कोरोना बाधित रूग्णांची संख्या 384 वर पोहोचली आहे. तर आज निगडीतील 32 वर्षाची महिला आणि 9 महिन्याच्या बाळासह जिल्ह्यातील पंधराजण "कोरोना' मुक्त झाल्यामुळे दिलासा मिळाला. 

सांगली - जिल्ह्यात आज आणखी 16 जणांना "कोरोना' ची लागण झाली. जत तालुक्‍यातील "हॉटस्पॉट' असलेल्या बिळूरमध्ये सहाजण, दुधोंडी (ता. पलूस) मध्ये पाच, तासगाव आणि ब्रह्मनाळ (ता. पलूस) मध्ये प्रत्येकी दोन आणि अथणी (जि. बेळगाव) येथून मिरजेत आलेला रूग्ण यांचा समावेश आहे. आज दिवसभरात 16 रूग्ण वाढले असून कोरोना बाधित रूग्णांची संख्या 384 वर पोहोचली आहे. तर आज निगडीतील 32 वर्षाची महिला आणि 9 महिन्याच्या बाळासह जिल्ह्यातील पंधराजण "कोरोना' मुक्त झाल्यामुळे दिलासा मिळाला. 

जत तालुक्‍यातील बिळूरमध्ये सोमवारी बिळूरमध्ये सहा रूग्ण सापडल्यानंतर आज आणखी सहा जण "कोरोना' बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सर्व रूग्ण कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत. रूग्णांमध्ये 50 वर्षाचा पुरुष, 38 व 27 वर्षाच्या दोन महिला, 21 वर्षाचा तरुण, 10 व 13 वर्षाची दोन मुले यांचा समावेश आहे. बिळूरमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे गाव "हॉटस्पॉट' बनले आहे. 

दुधोंडी (ता. पलूस) येथील एका जेष्ठ नेत्यास "कोरोना' झाल्यानंतर कुटुंबातील आणि संपर्कातील लोकांना संस्था "क्वारंटाईन' करण्यात आले होते. त्यापैकी 34 वर्षाचा तरूण, 56 वर्षाची महिला, 28 वर्षाची महिला, 23 वर्षाची महिला तसेच दोन वर्षाच्या बालकास दोन दिवसांपासून त्रास होत होता. त्यांचे "स्वॅब' तपासणीसाठी घेतले होते. पाचही जणांचा अहवाल आज "पॉझिटिव्ह' आला आहे. दुधोंडीत रूग्ण आढळल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

आज तासगावमधील खासगी रूग्णालयातील परिचारक व परिचारिका या दोघांना "कोराना' झाल्याचे स्पष्ट झाले. वाघापूर (ता. तासगाव) येथील महिलेला चार दिवसापूर्वी कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. ती तासगावमधील खासगी रूग्णालयात उपचार घेत होती. ती उपचार घेणाऱ्या रूग्णालयातील 40 वर्षाचा परिचारक आणि 50 वर्षाची परिचारिका यांचा "कोरोना' अहवाल "पॉझिटीव्ह' आला आहे. तसेच पलूस तालुक्‍यातील ब्रम्हनाळमध्ये चाळीस व छत्तीस वर्षीय पुरुषांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. अथणी (जि. बेळगाव) येथील चाळीस वर्षीय व्यक्तीस उपचारासाठी मिरजेतील कोविड रुग्णालयात आणले होते. तो देखील कोरोना बाधित आढळला आहे. 
जिल्ह्यात आज निगडी, शिराळा, मणदूर, किनरेवाडी, बामणोली, मौजे डिग्रज, दुधोंडी, आंधळी, पुजारवाडी, मांजर्डे, गव्हाण, वशी येथील एकुण पंधरा जण कोरोनामुक्त झाले. सध्या 131 रूग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी अमरापूर (ता. कडेगाव) येथील 68 वर्षाची महिला, बिळूर (ता.जत) येथील 75 वर्षाचा वृद्ध, बुधगाव (ता. मिरज) येथील 75 वर्षीय वृद्ध तसेच अथणी (जि. बेळगाव) येथील चाळीस वर्षीय व्यक्ती यांची प्रकृती गंभीर असून त्यांना "व्हेंटीलेटर' वर ठेवले आहे. 
जिल्ह्यातील चित्र 

  • उपचार घेणारे रूग्ण- 131 
  • बरे झालेले रूग्ण- 241 
  • आजअखेर मृत - 12 
  • आजअखेर रूग्ण- 384 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 patients in a day . Six more patients in "Hotspot 'Bilur, five patients in Dudhondi . Two each in Tasgaon, Brahmanal, one in Athani