चांदोली परिसरात 165 मिलिमीटर पावसाची नोंद...वारणा नदी पात्राबाहेर

chandoli dam.jpg
chandoli dam.jpg

वारणावती (सांगली)-  चांदोली धरण परिसरात तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी होत आहे. गेल्या 24 तासात 165 मिलिमीटर तर दिवसभरात 35 मिलीमीटर पाऊस येथे बरसला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. आज दुपारी तीन वाजता धरणाचे चारही दरवाजे उघडून तीन हजार क्‍युसेक्‍स व वीज निर्मिती केंद्रातून 1400 कयुसेक असा 4400 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. 

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात 22 हजार 120 कयु सेक पाण्याची आवक होत आहे.धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक यामुळे गेल्या 24 तासात धरणाची पाणीपातळी दोन मीटरने वाढली आहे. 

मुसळधार पाऊस तसेच धरणातील मुख्य दरवाजातून तसेच वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.नदी पात्राबाहेर पडली आहे . आरळा शित्तुर पुलाला पाणी लागले तर कोकरूड - रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पाऊस व वारणा नदीचा पुर यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
धरण पाणलोट क्षेत्रात तसेच चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे धरणातील विसर्ग कोणत्याही क्षणी वाढवण्याची शक्‍यता आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हे धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

सध्या चांदोली धरणाची पाणी पातळी दुपारी चार वाजता 620.90 मीटर इतकी आहे. धरणात 28.62 टीएमसी पाणीसाठा असून धरण 83.19 टक्के भरले आहे. आज अखेर 1389 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे.दरम्यान यावेळी वारणेच्या पाण्याचे विधीवत पुजन उपअभियंता मिलिंद किटवाडकर, शाखा अभियंता टी. एस. धामणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदय सामानगडकर, दिपक सनगर , रमेश यादव, राम जोशी, शिवाजी पाटील, बाळू कांबळे, बबन कांबळे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते. 

सतर्कतेचे आवाहन 
उपअभियंता मिलिंद किटवाडकर म्हणाले की, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे. पुराचे संकट निर्माण होवू नये म्हणून धरणातून आज पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तीन दरवाजे 0.75 मिटर व एक दरवाजा 0.50 मीटरने खुले करून त्यातून तीन हजार व वीजनिर्मिती केंद्राकडून एक हजार चारशे क्‍युसेक असा चार हजार चारशे क्‍युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात सुरू केला आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले तर पुन्हा दरवाजे बंद करून विसर्ग कमी केला जाईल.नदीकाठच्या गावानी सतर्कता बाळगावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com