सांगलीत 17 आणि मिरजेत 7 "कोरोना' बाधित...महापालिका क्षेत्रात तीनशेचा टप्पा पार 

घनशाम नवाथे
Sunday, 19 July 2020

सांगली- महापालिका क्षेत्रात आज रविवारी दुपारपर्यंत आणखी 24 "कोरोना' बाधित रूग्ण आढळले. त्यामध्ये सांगलीतील 17 आणि मिरजेतील सात रूग्णांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील आजअखेरची रूग्णसंख्या 316 पर्यंत पोहोचली आहे. 

महापालिका क्षेत्रात आठवडाभरात रूग्ण संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शहरातील अपवाद वगळता इतर भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाला आहे. शनिवारी महापालिका क्षेत्रात 38 रूग्ण सापडल्यामुळे एकुण रूग्णसंख्या 292 वर पोहोचली होती. त्यानंतर आज दुपारपर्यंत आणखी 24 रूग्ण महापालिका क्षेत्रात वाढले. त्यामुळे तीनशेचा टप्पा पार झाला आहे.

आज महापालिका क्षेत्रात भारती हॉस्पिटल स्टाफमधील पाच रूग्ण बाधित आढळले. तसेच शास्त्री चौकात तीन, खणभागात तीन तसेच भावे हॉस्पिटल परिसर, रतनशीनगर, संजयनगर, बायपास रस्ता, घनशामनगर, गवळी गल्ली, सांगलीवाडी, अष्टविनायक चौक येथे एक रूग्ण आढळले. बेथेलनगरमध्ये तीन, समतानगर व कमानवेस परिसरात एक रूग्ण आढळला. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रूग्ण आढळलेल्या ठिकाणी भेट देऊन सूचना दिल्या. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 in Sangli and 7 in Miraj affected by "corona"