बेळगाव : विद्युत धक्का बसून १७ वर्षीय युवतीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

17-year-old girl dies water heating coil electric shock belgaum
बेळगाव : विद्युत धक्का बसून १७ वर्षीय युवतीचा मृत्यू

बेळगाव : विद्युत धक्का बसून १७ वर्षीय युवतीचा मृत्यू

बेळगाव : पाणी गरम करण्याच्या कॉईलमुळे विद्युत धक्का बसून सोलापूर येथील १७ वर्षीय युवतीचा वडगाव बेळगाव येथे दुर्दैवी मृत्यू झाला. देवांशी योगेंद्र चव्हाण (मूळ रा. श्रीशैलनगर भावनीपेठ सोलापूर सध्या रा. आनंदनगर तिसरा क्रॉस वडगाव) असे तिचे नाव असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मयत देवांशीची आई तृप्ती यांनी या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तृप्ती त्यांचे सासर सोलापूर असून त्या मुलगी देवांशीला शाळेची सुट्टी असल्याने मुलीसोबत आनंदनगर वडगाव येथे आपल्या आईकडे राहायला आल्या होत्या.

बुधवार (ता.४) पासून त्या आपल्या मुली सोबत आईकडे राहिला होत्या. मंगळवार (ता.१७) सकाळी दहाच्या सुमारास सर्व जण घरात असताना मुलगी देवांशी ही आंघोळ करते असे सांगून बाथरूममध्ये गेली पंधरा-वीस मिनिटे झाली तरी देखील ती अंघोळ करून बाहेर आली नाही. त्यामुळे आई तृप्ती आणि बाथरूमकडे जाऊन तिला हाक दिली. मात्र, आतून कोणताच प्रतिसाद आला नाहीय त्यामुळे त्यांनी ही माहिती आपल्या आईला दिली आईने देखील हाक दिली असता आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भीतीपोटी तिघाजणांनी मिळून बाथरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी देवांशी ही बाथरूम खालीमध्ये पडल्याचे दिसून आले. त्यामुळे कुटुंबीयानी घरातील विद्युत पुरवठा खंडित केला. त्यावेळी देवांशीचा एक हात कॉईल लावण्यात आलेल्या बाथरूममलमधील बकेटमध्ये होता. त्यामुळे तिचा विद्युत धक्का बसल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. ही माहिती शहापूर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: 17 Year Old Girl Dies Water Heating Coil Electric Shock Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top