साईंच्या झोळीत साडेसतरा कोटींचे दान 

17.50 crore donation to Saibaba
17.50 crore donation to Saibaba
Updated on

शिर्डी : गेल्या अकरा दिवसांत साईंच्या दानपेटीत 17 कोटी 42 लाख रुपयांचे दान जमा झाले. 
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मागील अकरा दिवसांत सव्वाआठ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. 
याबाबत माहिती देताना कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले, की गेल्या वर्षीच्या दानाच्या तुलनेत 3 कोटी 37 लाख रुपये वाढले. साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने मागील वर्षी नाताळ व नववर्ष उत्सवात सुमारे 14 कोटी 5 लाख रुपयांचे दान केले होते. त्या तुलनेत यावर्षी देणगी स्वरूपात देणगी काउंटरवरून सुमारे 3 कोटी 46 लाख रुपयांचे दान आले. 

चेक, डीडी, मनिऑर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, बॅंकिंगचा वापर करणाऱ्या साईभक्तांनी 2 कोटी 93 लाख रुपयांचे दान केले. याच दरम्यान 42 लाख 31 हजार सोन्याच्या रूपाने 1 किलो 213 ग्रॅम वजनाचे दान आले. 5 लाख 80 हजारांची 17 किलो 223 ग्रॅम वजनाची चांदी आली आहे. दानपेटीत 9 कोटी 54 लाख रुपये निघाले. त्यात 24 लाख 36 हजार रुपयांचे परकीय देशाचे चलन आहे. त्याचप्रमाणे प्रसादालयात 8 लाख 11 हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. 7 लाख 68 भाविकांना मोफत बुंदीचे पाकिटे देण्यात आली. 5 लाख 96 हजार लाडू पॉकेटच्या विक्रीतून 1 कोटी 77 लाख 19 हजार 850 रुपये प्राप्त झाले. 

दरम्यान, साईआश्रम, द्वारावती, साई धर्मशाळा, साईबाबा भक्तनिवास (500 रूम), साईप्रसाद निवांत भक्तनिवास आदी निवासांद्वारे 1 लाख 71 हजार 855 भाविकांची व्यवस्था करण्यात आली. सशुल्क दर्शन पासेसमधून 4 कोटी 8 लाख 69 हजार 400, बायोमेट्रिक दर्शन पासेसमधून 8 लाख 23 हजार 996 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com