कुन्नूरला अवतरली शिवसृष्टी; कर्नाटक-महाराष्ट्रातून शिवप्रेमींची गर्दी

18 forts visit Crowd of Shiva lovers from Karnataka Maharashtra
18 forts visit Crowd of Shiva lovers from Karnataka Maharashtra

मांगूर (बेळगाव) : कुन्नूर (ता. निपाणी) येथे सध्या गड-किल्ल्यांच्या माध्यमातून साक्षात शिवसृष्टी अवतरली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १८ तरुण मंडळांकडून साकारलेले किल्ले पाहण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमींची गर्दी होत आहे. आठवडाभर शिवप्रेमींसाठी ही पर्वणी असेल.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना शाखेतर्फे सहा वर्षांपासून किल्ला स्पर्धा होतात. गड-किल्ले निर्मितीसाठी प्रत्येक मंडळाने ३० ते ४० हजार रुपये खर्च केला आहे. यंदा धुडगूस ग्रुपने सुवर्णदुर्ग, मोरया ग्रुपने पद्मदुर्ग, रणझुंजार ग्रुपने खांदेरी-उंदेरी, शंभूप्रेमी ग्रुपने राजगड, कुंभार बॉईजने राजगड, शिवप्रेमी ग्रुपने सिंहगड, जगदंब ग्रुपने कर्नाळ, जगदंब ग्रुपने पन्हाळा, भगवा रक्षकने वेताळगड, फ्रेंडस्‌ सर्कलने विजयदुर्ग, शिवभक्त मंडळाने प्रतापगड, स्वराज्य ग्रुपने प्रतापगड, मराठा योद्धा ग्रुपने सुंदरगड, आदर्श गल्ली मंडळाने राजगड, शिवशंभू ग्रुपने कोरीगड, छत्रपती स्पोर्टस्‌ क्‍लबने कांडगड, मराठा योद्धा मंडळाने देवगड व शिवभक्त तरुण मंडळाने आवासगडाची प्रतिकृती साकारली आहे. आकर्षक विद्युतरोषणाईमुळे वातावरण शिवमय 
बनले आहे. गडांमुळे छत्रपती शिवरायांच्या काळातील माहिती अभ्यासता आली. त्यांचा इतिहास आयुष्याला चांगली दिशा देण्यासाठी उपयोगी पडत आहे, असे शुभम जाधव 
यांनी सांगितले.

कुन्नूर आकर्षणाचा केंद्रबिंदू
गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, डीजे व लाईट शोमुळे कर्नाटक-महाराष्ट्रात कुन्नूरची ओळख आहे. डॉल्बीबंदीमुळे युवकांनी विविध उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला आहे. यंदा विविध गड-किल्ले उभारल्याने कुन्नूर कर्नाटक-महाराष्ट्रात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.

किल्ला स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदा १८ मंडळांनी गड-किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती साकारली. त्यांना पाहण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमी येत असल्याने समाधान वाटते.
- आशुतोष कणंगले, पदाधिकारी, किल्ला स्पर्धा समिती

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com