घटनास्थळी पोलीस प्रशासन (Miraj Police) दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
Temple Gold Theft : आरग (ता. मिरज) येथील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरात (Padmavati Mata Temple) चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाभाऱ्यातील १८ तोळे सोने (Gold Jewelry) चोरट्यांनी लंपास केले आहे. मंदिराचे उपाध्ये पुजारी सकाळी पूजाअर्चा करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने आरगसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.