बेळगाव शहरात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू ; तर आणखी २२ जणांना कोरोनाची बाधा

मल्लिकार्जुन मुगळी
Wednesday, 15 July 2020

शहरात नव्या २२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

बेळगाव  : बेळगाव शहरात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकजण कुमारस्वामी ले आऊट येथील आहे तर दुसरी व्यक्ती अनगोळ येथील झटपट कॉलनीतील आहे. शिवाय शहरात नव्या २२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध बुधवारी सकाळी सुरू झाला आहे. बाधित व मृत व्यक्तीची माहिती आरोग्य विभागाकडून बेळगाव महापालिकेला देण्यात आली आहे.

हेही वाचा- गुणी कबड्डीपटूंना दर्जेदार कामाची पोचपावती कधी?

बधितांना तातडीने कोविड कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जून महिन्याच्या अखेरपासून वाढू लागली आहे. मृत्यूचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. गेल्या दोन दिवसात शहरात २४ बाधित सापडले होते त्यात आता आणखी २२ जणांची भर पडली आहे. नव्याने सापडलेले बाधित सुभाषनगर, महांतेशनगर, माळमारुती, आंबेडकर गल्ली, माळी गल्ली, वंटमुरी कॉलनी, फुले गल्ली, नानावाडी, आंबेडकर नगर, मजगाव येथील आहेत. त्यांच्या प्रथम व द्वितीय संपर्कातील लोकांचे होम क्वांरन्टाईन, मृत व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, सील डाउन प्रक्रिया महापालिकेने हाती घेतली आहे.

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 more corona patient death in belgaum