जिल्ह्यात दिवसभरात 20 रुग्ण; 12 कोरोनामुक्त

शैलेश पेटकर 
Tuesday, 9 March 2021

जिल्ह्यात आज दिवसभरात 20 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर सांगली शहरातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पालिका क्षेत्रात पाच जण बाधित आढळून आले. दिवसभरात 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 270 रुग्ण उपचार आहेत. 

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 20 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर सांगली शहरातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पालिका क्षेत्रात पाच जण बाधित आढळून आले. दिवसभरात 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 270 रुग्ण उपचार आहेत. 

आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत 220 जणांचे स्वॅब तपासले. त्यात 5 जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 585 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 15 जण कोरोना बाधित आढळले. वाळवा तालुक्‍यातील 9 जणांना, तर आटपाडी तालुक्‍यातील तिघांना बाधा झाली.

जत, मिरज, कडेगाव तालुक्‍यात प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळले. तर पालिका क्षेत्रातील सांगलीत दोन, तर मिरजेत तीन बाधित आढळले. 12 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 270 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 45 जण चिंताजनक आहेत. 190 रुग्ण गृहअलकीकरणात आहेत. 80 जण रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील चित्र 
आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण- 48723 
आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46690 
सध्या उपचार घेणारे रुग्ण- 270 
आजअखेर जिल्ह्यातील मृत्यू- 1763 
ग्रामीण भागातील रुग्ण- 24645 
शहरी भागातील रुग्ण- 7269 
महापालिका क्षेत्र रुग्ण- 16809 

कोरोना तालुकानिहाय स्थिती 
आटपाडी- 2540 
जत- 2359 
कडेगाव- 2974 
कवठे महांकाळ- 2496 
खानापूर- 3037 
मिरज- 4563 
पलूस- 2636 
शिराळा- 2301 
तासगाव- 3463 
वाळवा- 5545 
महापालिका- 16809 
एकूण - 48723 

 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 patients per day in the district; 12 corona free